29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरक्राईमनामादादर हादरले! छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी

दादर हादरले! छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी

मदतकार्य सुरू, स्फोटात एका कारचे नुकसान झाल्याचे समोर

Google News Follow

Related

दादर येथे असलेल्या छबीलदास हायस्कूलमध्ये चार सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे कळते.

दादर येथे टिळक पुलाच्या जवळच ही शाळा असून या शाळेची नव्या ढंगातील इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र बुधवारच्या दिवशी ही शाळा स्फोटाने हादरली. शाळेत ठेवलेल्या चार सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे शाळेचे मोठे नुकसानही झाले आहे.

हे ही वाचा:

पुलवामा हल्ल्यातील जवानांची थट्टा उडविणाऱ्याला ५ वर्षाची कैद

एवढी हिम्मत ! पोलीस अधिकाऱ्याच्याच खुर्चीत बसून केला व्हिडिओ शूट

कळव्यात घराचा स्लॅब तळमजल्यावरील सलूनमध्ये कोसळला

कठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो

 

पहाटे ५ वाजता हा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटे स्फोट झाल्यानंतर हा परिसर दणाणून गेला आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. शाळेच्या परिसरात फुटलेले सामान पडल्याचे दिसते आहे तसेच जवळ उभी असलेला कारही या स्फोटामुळे नुकसानग्रस्त झाल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. य़ासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या स्फोटाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा