28 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरक्राईमनामागोवंडीत ‘लव्ह ट्रँगल’चा रक्तरंजित शेवट; १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

गोवंडीत ‘लव्ह ट्रँगल’चा रक्तरंजित शेवट; १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

Google News Follow

Related

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने पूर्व उपनगर हादरून गेले आहे. कमला रामननगर येथे १९ वर्षीय तरुणीवर भरदिवसा गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमागे ‘लव्ह ट्रँगल’ असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिफा शेख असे मृत तरुणीचे नाव असून ती आपल्या आई- वडील आणि भावंडांसह गोवंडी शिवाजीनगर येथील कमला रामननगर झोपडपट्टीत राहत होती. शिफाचे वडील लहान- मोठी बांधकाम कंत्राटे घेण्याचे काम करतात. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शिफाचे नदीम नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, नदीमवर आणखी एका तरुणीचेही प्रेम असल्याची माहिती समोर येत असून, त्यातूनच हा वाद टोकाला गेल्याचा संशय आहे.

मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिफा नाश्ता करण्यासाठी घराबाहेर पडली होती. काही वेळानंतर ती घरापासून काही अंतरावर जखमी अवस्थेत स्थानिकांना आढळून आली. तिला तातडीने रिक्षाने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. शिफाच्या गळ्यावर आणि गालावर गोळी लागल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र शिफावर नेमकी कुठे आणि कोणी गोळी झाडली, याबाबत ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिसांनी मृत तरुणीच्या आई- वडिलांचे जबाब नोंदवून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.

हे ही वाचा:

सरकारी कार्यक्रमांमध्ये सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!

आता यूपीआयद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा

विदिशा येथे १००० वर्षे जुन्या मंदिरातील विष्णू मूर्तीची विटंबना

गोवा विशेष: राज्याची संस्कृती डिजिटल होणार!

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या गोळीबारात महिलेचा सहभाग असण्याचीही शक्यता तपासली जात आहे. शिफाचा प्रियकर नदीम तसेच नदीमवर प्रेम करणाऱ्या कथित तरुणीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी शिफाचा मोबाईल ताब्यात घेतला असून तिचे मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून चौकशी करून जबाब नोंदवले जात आहेत.
या थरारक घटनेने गोवंडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ‘लव्ह ट्रँगल’मधून झालेल्या या हत्येचा उलगडा लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा