32 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरक्राईमनामामार्शल्सचा मुजोरपणा थांबण्याचे नाव घेईना!

मार्शल्सचा मुजोरपणा थांबण्याचे नाव घेईना!

Google News Follow

Related

शहरामध्ये गेल्याकाही दिवसांपासून बोगस मार्शलकडून नागरिकांची लुबाडणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे असले तरी, मार्शल्स आजही रस्त्यावर उगाचच नागरिकांकडून दंड वसुली करताना दिसताहेत. मुख्य बाब म्हणजे नागरिकांच्या लुटमारीप्रकरणी मुंबई महापालिकेने क्लिनअप मार्शलचे दंड वसुलीचा अधिकार रद्द करण्याची घोषणा केली होती. घाटकोपरमधील मार्शलवर तक्रार दाखल झाल्यानंतरही अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच मार्शलसच्या मुजोरीवरुन आता नागरिकांमध्ये चांगलाच संताप दिसून येत आहे.

घाटकोपरमधील टिळक रोडवरील बोगस क्लीन-अप मार्शल टोळी नुकतीच निदर्शनास आली. स्थानिकांनी विरोध केल्यानंतर मार्शल पळून गेले. यासंबंधी मग सर्व पुरावे एकत्र करण्यात आले. यामध्ये त्यांच्या मोटारसायकलची छायाचित्रे घेऊन बोगस पावती पुस्तक, ओळखपत्र आणि जॅकेटसह दरोडा सुरू असल्याची तक्रारही पालिकेकडे करण्यात आली आहे. माजी स्थानिक नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस टोळीविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. तशी ही तक्रार आता पंतनगर पोलिस ठाण्यात आता दाखलही केलेली आहे.

 

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था किती टक्क्याने वाढणार? वाचा सविस्तर…

पार्टीची शोभा वाढविण्यासाठी बोलावण्यात आल्याचा आर्यन खानचा दावा

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे विद्युत क्षेत्राला मिळणार ऊर्जा

छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?

 

मार्शल्स दिवसागणिक आता चांगलेच डोकेदुखी ठरलेले आहेत. या मार्शलना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही आहेत. काही मार्शल लॉ इंफोर्सर्स कारवाईच्या नावाखाली लोकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मध्यंतरी एका मार्शलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या मार्शलने हातात दगड घेऊन एका नागरिकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी याच मार्शलला उपस्थित जमावाने चांगलाच चोप दिलेला होता.

महापालिकेने नेमून दिलेले मार्शल्स हे गणवेशात असणे आवश्यक आहे. परंतु असे मात्र दिसत नसल्याने आता हे बोगस मार्शल्स नागरिकांना थांबवून उगाच लुटू लागलेले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा