29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाप्रदीप शर्मांचा जामीन न्यायालयाने नाकारला

प्रदीप शर्मांचा जामीन न्यायालयाने नाकारला

अँटिलिया बॉम्ब, मनसुख हिरेन हत्या प्रकरण

Google News Follow

Related

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अँटिलिया बॉम्ब आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारा शर्मा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. एनआयए विशेष न्यायालयाच्या फेब्रुवारी २०२२ च्या आदेशाला आव्हान देत शर्मा यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर एनआयए कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने हिरेनच्या हत्येसाठी शर्माने त्याचा माजी सहकारी सचिन वाजे याला मदत केल्याचा आरोप केला आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी ‘अँटिलिया’जवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. ही एसयूव्ही ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. मनसुख हिरेन मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील खाडीत सापडला होता. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जून २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

प्रदीप शर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत असा दावा त्यांनी दावा केला होता. प्रदीप हा हिरेनच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा एनआयएचा आरोप आहे. अंबानी कुटुंबाला घाबरवण्याचा कट हिरेनला माहीत होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असा शर्मा यांच्यावर आरोप आहे.

हे ही वाचा:

मौलाना रशिदीने गरळ ओकली; म्हणे सोमनाथ मंदिरात गैरव्यवहार होत होते म्हणून ते तोडले

अख्ख्या पाकिस्तानची बत्ती गुल!

युती टिकवायचे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही

सरसंघचालक म्हणाले,नेताजींची स्वप्ने अजून अपूर्ण

वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकारासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील

प्रदीप शर्मा हा टोळीचा सक्रिय सदस्य होता, ज्याने अंबानी कुटुंबासह इतरांना धमकावण्याचा कट रचला आणि नंतर मनसुख हिरेनची हत्या केली, कारण त्याला याची माहिती होती असे एनआयएने म्हटले होते. हिरेनला संपूर्ण कटाची माहिती होती (अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन लावणे) आणि आरोपी शर्मा आणि वाजे या दोघांनाही भीती वाटत होती की हिरेनच्या माध्यमातून त्यांचे पितळ उघडे पडेल असा दावा एनआयएने केला होता

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा