30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरराजकारणयुती टिकवायचे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही

युती टिकवायचे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही

उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार घणाघात

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा झाला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. युती टिकवायचे हे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत. उद्धव ठाकरे घराच्या बाहेरच निघत नाही, असा  केला आहे.

वंचित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यानाच्या युतीवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की , जे आपल्या ४० आमदारांना सांभाळू शकत नाही, आपलं घर सांभाळू शकत नाही. ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याची मला शंका आहे. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ नेते आहेत. त्यांची ठाकरे गटासोबत युती फार काळ टीकणार नाही. प्रकाश आंबेडकर एक दिवस कंटाळणार. कारण उद्धव ठाकरे यांचा संवाद नाही. संवाद करणं हे त्यांच्या रक्तात नाही. युती टिकवायला मनाचं मोठंपण लागतं. समर्पण लागतं. युती टिकवायचे हे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत. उद्धव ठाकरे घराच्या बाहेरच निघत नाही, असा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांच्यात हल्ला करतांना बावनकुळे म्हणाले , उद्धव ठाकरे यांना आता लोकशाही आठवतेय. आता ते मातोश्रीच्या बाहेर पडायला लागलेत. मोदी यांनी त्यांना लोकशाहीपर्यंत आणलंय, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांबाबत काय निर्णय घ्यावा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण या दोन्ही जागांवर आम्ही उमेदवार देणार आहोत.आमचे उमेदवार निवडून येतील. या दोन्ही जागा आमच्या आहेत. महाविकास आघाडीने काही केलं तरी या जागा आम्ही जिंकू. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. ते कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांबाबत निर्णय घेतील असे बावनकुळे यांनी पोटनिवडणुकांबद्दल बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा