25 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरदेश दुनियापाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज यांचं प्रतिपादन

Google News Follow

Related

पाकिस्तानवर आलेल्या दिवाळखोरीच्या संकटानंतर त्यांचे डोळे खाडकन उघडले आहेत. भारताशी केलेल्या युद्धांमुळे आम्ही गरिबी, बेरोजगारीच्या संकटांचा सामना करत आहोत, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे.

एका मुलाखतीत शरीफ म्हणाले की, भारताशी तीन युद्धे लढून आम्हाला फक्त गरिबी, बेरोजगारी मिळाली. आता पंतप्रधान मोदी यांनी आमच्यासोबत चर्चा करून काश्मीर प्रश्नावर गंभीर चर्चा करावी, समजूतदारपणे हा प्रश्न मिटवावा. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी संदेश पाठवला असून शाहबाज म्हणाले, “आपण समोरासमोर बसून काश्मीरसारख्या मुद्द्यांवर समजूतदारपणे चर्चा करू”.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तान बेरोजगारी आणि महागाईशी झगडत असताना शाहबाज यांचे हे वक्तव्य आले आहे. खाद्यपदार्थ आणि डिझेल आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानची मीडिया उघडपणे पंतप्रधान मोदींची प्रशंसा करत म्हणत आहे की, भारत प्रत्येक बाबतीत शक्तिशाली आहे. युक्रेनच्या मुद्द्यावरून जेव्हा अमेरिका आणि रशियामध्ये मतभेद आहेत, तेव्हा ते दोन्ही देश भारताच्या पाठीशी उभे असल्याचे पाकिस्तानी मीडियाच म्हणणे आहे. ही भारताची सर्वोत्तम मुत्सद्देगिरी आहे असं दिसून येतं.

शहजाद चौधरी यांनी पाकिस्तानातील एका इंग्रजी वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’मध्ये भारताविषयी संपादकीय लिहिले आहे. शहजाद हे राजकीय, सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषक आहेत.चौधरी,रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर आहेत. तिसऱ्या महायुद्धाची भीती जगाला सतावत असून याचा दुसरा पैलू पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिका आणि रशिया आमनेसामने आहेत,तरीही हे दोन्ही देश भारताच्या पाठीशी उभे आहेत हेही पाहणं महत्वाचे आहे.

भारत-पाकिस्तान मुद्द्यावर शाहबाज  तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. 

काश्मीर या मुद्द्यावर भारत चर्चेसाठी तयार,असा संदेश जगाला गेला पाहिजे. शाहबाज पुढे म्हणाले, “काश्मीरमध्ये नेहमीच मानवी हक्कांच उल्लंघन केल जात कलम ३७० अंतर्गत काश्मिरींना मिळालेले अधिकार भारताने काढून घेतले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये स्वायत्तता रद्द करण्यात आली. हे सर्व कोणत्याही किंमतीत थांबले पाहिजे. त्यामुळे जगाला संदेश जाईल की भारत चर्चेसाठी तयार आहे.”

हे ही वाचा:

बुडणाऱ्यांना पंकजांचा आधार!

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला घातल्या गोळ्या

छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक बाधला

भारत-पाकिस्तान संबंध शांतता राखणे किंवा लढत राहणे हे आपल्यावर अवलंबून आहे. ते म्हणाले की , “भारत आणि पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे.आपण एकत्र शांततेत राहणे, प्रगती करणे की लढत राहणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आम्ही भारतासोबत तीन युद्ध केली. यामुळेच आम्हाला गरीबी, बेरोजगारी मिळाली. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत. आम्हाला शांततेत जगायचे आहे. आम्हाला आमचे खरे प्रश्न सोडवायचे आहेत.”

तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की, आम्हांला दारूगोळ्यावर आमची संसाधने वाया घालवायची नाहीत. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, “आम्हाला गरिबी संपवायची आहे. आम्हाला समृद्धी आणि प्रगती हवी आहे. आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, त्यांना आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे.आम्ही आमची संसाधने बॉम्ब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा