33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाजोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

तज्ज्ञांची टीम रवाना

Google News Follow

Related

उत्तराखंड प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जोशीमठमधील दोन मोठी हॉटेल्स पाडण्यास सुरुवात केल्यानंतर जेपी निवासी कॉलनीतील संरचना यांत्रिकरीत्या पाडण्याचा निर्णय घेतला असून ही दुसरी मोठी कारवाई करण्यांत आली आहे.
उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव रणजीत कुमार सिन्हा यांनी त्यांच्या टीमसह जोशीमठच्या पलीकडे हाती पर्वताकडे परिस्थिती जाणून घेण्यासाठी गेले असता त्यांना चित्र स्पष्ट दिसले. नुकतेच, राज्यातील विविध यंत्रणांच्या पथकाच्या तपासणीदरम्यान,जेपी कॉलनीच्या एका टोकाला भूस्खलनामुळे एका सरळ भागात भरपूर नुकसान झाल्याचे आढळून आले असून तिथे वसाहती खालून पाणी वाहत आहे.

वसाहतीतून किती घरे हटवायची आहेत, याबाबत सिन्हा म्हणाले की, चमोलीच्या डीएमला सर्वेक्षण करून अशा बांधकामांची संख्या सांगण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये नुकसान झालेली घरे व कल्व्हर्ट लवकरात लवकर शास्त्रोक्त पद्धतीने पाडण्यात येणार आहेत.

भेगा पडलेल्या घरांची संख्या ८४९
जोशीमठमध्ये भेगा पडलेल्या घरांची संख्या ८४९ झाली आहे. १६५ घरे असुरक्षित आहेत. रणजीत सिन्हा यांनी सांगितले की, नवीन घरांमध्ये भेगा दिस ले ल्या नाहीत. जुन्या भेगा एक ते दोन मिमीने वाढल्या असून भेगा पडलेल्या घरांच्या वाढत्या संख्येबाबत ते म्हणाले की, सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या दरम्यान ज्या घरांना भेगा पडल्या आहेत त्यांची नोंद केली जात आहे.याचा अर्थ असा नाही की हे नवीन क्रॅक आहेत.

अकरा जानेवारी रोजी, सीएम पुष्कर धामी यांनी जोशीमठला भेट दिली होती, जिथे त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली आणि तेव्हा त्यांनी लोकांना आश्वासन दिले की आवश्यकतेशिवाय शहरातील घरे पाडली जाणार नाहीत.
दुसर्‍या भेटीदरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शहरातील पीडित कुटुंबांची भेट घेतली आणि त्रासलेल्या रहिवाशांना आश्वासन दिल की अपरिहार्य असल्याशिवाय आणि गरज असल्याशिवाय शहरातील घर पाडली जाणार नाहीत आणि त्यांची “फसवणूक करू नका” अशी विनंती केली.  मुख्य सचिवांना अपरिहार्य असल्याशिवाय कोणतीही घरे पाडू नयेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि स्थानिकांशी त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी नियमित संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

 

तज्ज्ञांची टीम पोहोचली
दरम्यान, हैदराबादच्या नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकीच्या तज्ज्ञांची टीम सोमवारी १६ जानेवारीला रुरकीला पोहोचली. घरांमध्ये पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी आणि पाण्याचा स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात टीमने जोशीमठ परिसराचे सखोल भूभौतिकीय सर्वेक्षण सुरू केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा