30 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरक्राईमनामासायबर गुन्ह्यासाठी ४५०० सीम कार्ड; चीन पाकिस्तान कनेक्शन

सायबर गुन्ह्यासाठी ४५०० सीम कार्ड; चीन पाकिस्तान कनेक्शन

अहमदाबाद पोलिसांचा मोठा खुलासा

Google News Follow

Related

एका कंपनीतील कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून तब्बल १.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास करताना अहमदाबाद पोलिसांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या तपासात सायबर गुन्ह्यांसाठी सुमारे ४,५०० सिमकार्ड वापरल्याचे समोर आले असून, या नेटवर्कचे धागेदोरे चीन आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचा पोलिसांचा दावा आहे.

या प्रकरणाची सुरुवात जूनमध्ये झाली. सायबर ठगांनी कंपनीतील एका कर्मचाऱ्याशी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने संपर्क साधला आणि त्याला तब्बल १.५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणुकीची माहिती मिळताच अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे फसवणुकीतील सुमारे १.३ कोटी रुपये परत मिळवण्यात यश आले.

तपासादरम्यान पोलिसांनी पश्चिम बंगालमधून इम्रान अली पियादा आणि इंजामुल मुजीबर मोल्ला या दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. यातील एका उपकरणातून एकाच वेळी चार सिमकार्ड चालवता येत असल्याचे तपासात समोर आले. चौकशीत आरोपींनी सायबर गुन्ह्यांसाठी तब्बल ४,५०० सिमकार्ड मिळवल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांच्या तपासात या नेटवर्ककडून ओटीपीचा गैरवापर केल्याचेही समोर आले आहे. आरोपींनी ई-कॉमर्स आणि ऑनलाइन गेमिंगसाठी सुमारे २१ हजार ओटीपी पुरवल्याचा संशय आहे. प्रत्येक ओटीपीसाठी सरासरी १०० रुपये आकारले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच व्हॉट्सअॅप अकाउंट सक्रिय करण्यासाठी सुमारे ९०० ओटीपी प्रत्येकी सरासरी २५० रुपयांना विकल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपींशी संबंधित मोबाइल क्रमांकांविरोधात देशातील २६ राज्यांमधून २५१ तक्रारी नोंदवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे नेटवर्क केवळ एका ‘बॉस स्कॅम’पुरते मर्यादित नसून अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यांसाठी डिजिटल सुविधा पुरवत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

उड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले… काय घडले म्युनिक विमानतळावर?

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

गॉल कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्स गरज

तपासात या नेटवर्कमध्ये चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या मालवेअरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. हे मालवेअर हाँगकाँगमधून ऑपरेट होत असल्याचे तपासात आढळले. तसेच नेटवर्कशी संबंधित एक कॉल सेंटर इस्लामाबादमधून चालवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फसवणुकीतून मिळालेला पैसा अनेक देशांमधून फिरवून त्याचा माग काढणे कठीण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा