29 C
Mumbai
Saturday, March 28, 2026
घरक्राईमनामाखतरनाक स्टंट करणाऱ्या अरमानला ठोकल्या बेड्या

खतरनाक स्टंट करणाऱ्या अरमानला ठोकल्या बेड्या

Google News Follow

Related

प्रसिद्धीसाठी रेल्वे रुळावर खतरनाक स्टंट करणाऱ्या एका तरुणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. या तरुणाने काही दिवसापूर्वीच अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान खतरनाक स्टंट करून त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अरमान शेख असे या तरुणाचे नाव असून तो घाटकोपर पश्चिम वैतागवाडी आहे. अरमान शेख हा इस्टांग्राम, टिकटॉक यासारख्या सोशल मीडियावर स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे या सोशल मीडियावर लाखो फॉलोवर आहेत. काही दिवसापूर्वीच त्याचा एका व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, या व्हिडियोत त्याने रेल्वे रुळावर बसून पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करीत असल्याचा खतरनाक स्टंट केला होता.

हे ही वाचा:

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

पवारांना घरी जाऊन लस कुणी दिली, याचे गूढ कायम

सरन्यायाधीश एनव्ही रमणा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

‘केंद्राने लस पुरवली म्हणूनच अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले ना?’

हा व्हिडियो व्हायरला होताच अरमान याने स्टंट केल्याचे ठिकाण शोधून काढण्यात आले असता त्याने अंधेरी जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा स्टंट केल्याचे समोर आले. मग अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अरमान याला गुरुवारी घाटकोपर येथून अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध अनधिकृतरित्या रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करणे, तसेच सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच विना तिकीट रेल्वे कायदा अंतगर्त गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा