29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

Related

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात बरिच उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ही भेट राजकीय स्वरूपाची नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले असले, तरीही या भेटीवरून भारतीय जनता पार्टीकडून शरद पवारांना टोला लगावण्यात आला आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या अनोख्या अंदाजात पवारांना लक्ष्य केले आहे.

शुक्रवार, ११ जून रोजी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांना साथ देत त्यांना विजयश्री संपादन करण्यात मदत केली. त्याआधी प्रशांत किशोर यांनी बिहार, पंजाब, आंध्र प्रदेश, दिल्ली अशा अनेक राज्यांत विधानसभा निवडणुकांमध्ये यशस्वीपणे राजकीय कॅंम्पेन्स केली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

अनधिकृत इमारतींबद्दल पालिका काय करते आहे?

सरन्यायाधीश एनव्ही रमणा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला

या भेटीवरून भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ‘संपूर्ण आयुष्य राजकारणात गेल्यानंतरही शरद पवार यांच्या पक्षाला ना कधी विधानसभा निवडणुकीत ७० पेक्षा अधिक जागा मिळवता आल्या, ना १० पेक्षा जास्त खासदारकीच्या जागा मिळवता आल्या. त्यामुळे त्या मिळविण्याकरता काय करावे लागेल याचे ज्ञान घेण्याचा बहुदा शरद पवार प्रयत्न करतील.’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे. ‘पण त्यांनी लक्षात ठेवावे की प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने राहुल गांधी पराभूत झालेले आहेत’ असेही भातखळकर म्हणाले. तर या सोबतच पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीत बहुदा पंढरपूर पराभवाबद्दल चर्चा झाली असावी. तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर पवार यांनी किशोर यांचे मत घेतले असावे अशी फटकेबाजी भातखळकर यांनी केली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा