भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुरुवार, ८ मे रोजी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये ७ मे आणि ८ मे च्या मध्यरात्री एका पाकिस्तानी घुसखोराला ठार करण्यात आल्याची माहिती आहे. या घुसखोराची ओळख अद्याप पटलेली नसून हा घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमेवरून अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता.
एक व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सुरक्षा कुंपणाच्या दिशेने पुढे सरकत होता. बीएसएफ जवानांनी आवाहन केल्यानंतरही त्याने पुढे जाणे सुरूच ठेवले. त्याने थांबण्यास नकार दिल्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला, अशी माहिती एएनआयने दिली आहे. संपूर्ण कारवाईदरम्यान बीएसएफ जवान सतर्क होते. पहाटेच्या सुमारास मृत घुसखोराचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अद्याप संबंधित व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा..
क्लायमेट फायनान्स टॅक्सोनॉमीसाठी केंद्राने मागवले तज्ज्ञांचे अभिप्राय
४३० विमानांचे रद्द, १० मेपर्यंत २७ विमानतळ बंद
ट्रम्प यांनी सर्जन जनरल म्हणून नियुक्त केलेल्या ‘केसी मीन्स’ कोण आहेत
उदित राज आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हुसैन भडकले
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून एकूण ५९ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी ४४ केवळ पूंछ जिल्ह्यात आहेत. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘एक्स्टर्नल पब्लिसिटी अॅण्ड पब्लिक डिप्लोमसी डिव्हिजन’ने दिली. ७ मे रोजी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून एलओसीवर जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून २५-२६ एप्रिलच्या रात्रीपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत लहान शस्त्रांद्वारे गोळीबार सुरू आहे.







