28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरक्राईमनामाप्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ

प्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ

एआयएमआयएम नेत्या जहां आरा शेख यांनी केला व्हीडिओ

Google News Follow

Related

मुंबईतील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कोपर रुग्णालयातील प्रसूती विभागात बुरखा घालून प्रवेश करणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्यावरून एमआयएमआयएमच्या मुंबई उपाध्यक्ष मुस्लिम महिलेने गोंधळ घातला आणि याचा व्हीडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. या प्रकरणात एआयएमआयएम मुंबईच्या उपाध्यक्षा आणि अधिवक्ता जहां आरा शेख यांनी आपली बाजू मांडताना रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. बुरख्यातील महिलांची तपासणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी सदर महिलेने केली.

जहां आरा यांनी सांगितले की, त्या रविवारी रुग्णालयात आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूती विभागाच्या बाहेर एका सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांचा चेहरा झाकलेला नव्हता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला बुरखा काढण्याचे कारण विचारले.

‘बुरखा घातल्यामुळे मुले चोरीला जातात’ 

जहां आरा यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितले की, बुरखा घालून आत गेल्यास मुले चोरीला जातात. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, रुग्णालयातून मुले चोरीला जात असतील, तर त्यासाठी महिलांच्या पोशाखाला जबाबदार धरता येणार नाही. मूल चोरीला जाणे ही सुरक्षाव्यवस्थेची अपयश आहे आणि त्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची असली पाहिजे.

जहां आरा यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना केली की, जर प्रसूती विभागातील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता असेल, तर तेथे पुरेशा संख्येने सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे. त्यांनी विशेषतः महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली, जेणेकरून महिला रुग्ण आणि त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या महिलांची योग्य पद्धतीने तपासणी करता येईल.

हे ही वाचा:

एनआरआयच्या ठेवींमुळे भारताचा परकीय चलनसाठा मजबूत

तिलक वर्माचा धडाका! साऊथ झोन फायनलमध्ये

२०० वर्षांनी घरात मुलगी झाली हो!

ऑगस्टमध्ये होंडाच्या दुचाकीच्या विक्रीत ८ टक्क्यांची वाढ

जहां आरा यांनी म्हटले की, बुरखा घालणे ही त्यांची वैयक्तिक निवड आहे आणि कोणत्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला बुरखा काढण्यास सांगणे तिला अस्वस्थ करणारे आहे. अशा प्रकारच्या मागणीमुळे मुस्लिम महिलांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा त्यांनी आरोप केला. त्या म्हणाल्या, “बुरखा घालून आम्ही जाऊ शकतो, ही आमची निवड आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा आम्हाला बुरखा काढण्यास सांगू शकत नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा