29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामामुल दत्तक देण्याच्या नावावर जोडप्याला लुबाडले

मुल दत्तक देण्याच्या नावावर जोडप्याला लुबाडले

Google News Follow

Related

कांदिवली येथे मूल दत्तक घेत असलेल्या एका जोडप्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने या जोडप्याच्या नावाखाली बरेच गुन्हे केले असल्याची शंका देखील व्यक्त केली जातं आहे.
तक्रारदार महिलेच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. २०२० मध्ये, एका परिचिताने तिची ओळख एका एजंट, साहिल शेखशी करून दिली होती. मुल दत्तक घेण्यासाठी तो इसम मदत करेल अशी माहिती देण्यात आली होती. शेख यांनी मूल दत्तक घेण्याच्या फॉर्मसह जोडप्याच्या घरी भेट दिली.  त्याच्या स्वाक्षर्‍या आणि फोटो काढले तसेच त्यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांचे तपशील घेतले .
शेख यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितले की, या प्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये खर्च येईल. मी त्यांना सांगितले की इतके पैसे देणे आम्हाला परवडणार नाही, असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. तरीही त्या जोडप्याने १ लाख ५० हजार रुपये भरले. थोड्या दिवसांनी त्याने त्या जोडप्याला एका नवी मुंबईतील मुलीचा फोटो दाखवला. पण नंतर शेख यांनी या संबंधी बोलण्बयास टाळाटाळ करू लागला.
हे ही वाचा:
पुढे यादरम्यान या जोडप्याला एका कंपनीकडून कर्ज घेतल्यासंदर्भात फोन आला. त्या कंपनीने ६ हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड मागितली. या जोडप्याने स्पष्ट केले की त्यांनी कधीही कोणाकडून कर्ज घेतले नाही. तसेच यावर्षी ऑगस्टमध्ये या  महिलेला दुसर्‍या कंपनीकडून पुन्हा फोन आला आणि ८० हजार  रुपयांच्या ऑटोमोबाईल कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली. हे सर्व पाहून तिने शेख याची चौकशी केली. त्या चौकशीनंतर तिला असे वाटले की तो तिच्या नावावर कर्जाचा लाभ घेत आहे, आणि दत्तक प्रक्रियेसाठी त्याने गोळा केलेले तिचा ओळख पुरावे आणि फोटोंचा गैरवापर करीत आहे. तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बऱ्याच नोटिस मिळत राहिल्या म्हणून समता नगर पोलिस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली. बुधवारी शेख यांच्याविरूद्ध फसवणूकीचे एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा