27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामाबंगाल: शिव मंदिराच्या तोडफोडीवरून हिंसाचार आणि दगडफेक; ४० जणांना अटक!

बंगाल: शिव मंदिराच्या तोडफोडीवरून हिंसाचार आणि दगडफेक; ४० जणांना अटक!

भाजपाकडून निषेध 

Google News Follow

Related

बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतळा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव निर्माण झाला, ज्यामुळे एका शिव मंदिराची तोडफोड झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ चा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात आतापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आली आहे आणि छापेमारी सुरू आहे. “सध्या छापे टाकले जात आहेत आणि अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत. अनेकांना अटक करण्यात आली आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

महेशतळा येथील शिवमंदिराच्या समोर एका व्यक्तीला दुकान उभारण्यापासून रोखल्याने हा वाद निर्माण झाल्याची माहिती आहे. स्थानिक रहिवाशांनी या निर्णयाला विरोध केला आणि त्याठिकाणी एक छोटे तुळशी मंदिर (तुळस कट्टा) बांधले, ज्यामुळे हिंसक प्रतिक्रिया निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनगर पोलिस ठाण्याबाहेर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, वाहने जाळली. “छतावरून विटा फेकण्यात आल्या, रस्त्यांवर टायर जाळण्यात आले आणि हल्लेखोरांनी पोलिस ठाण्यासमोरील मोटारसायकल जाळली,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि विट लागल्याने किमान एक पोलिस कर्मचारी रक्तबंबाळ झाला,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि कोलकाता आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) कडून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. दगडफेकीत एका महिला कॉन्स्टेबलसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

या घटनेवरून भाजपने राजकीय आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी अलिपूर येथील पश्चिम बंगाल पोलिस मुख्यालयाबाहेर केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी करत निदर्शने केली. “रवींद्रनगरमधील हिंदू समुदायाला तासनतास लूटमार, जाळपोळ आणि हिंसाचार सहन करावा लागत आहे, तर पोलीस शांतपणे पाहत होते. अनेक पोलिस वाहनांना आग लावण्यात आली, तरीही कोणताही प्रभावी हस्तक्षेप झाला नाही,” असे अधिकारी म्हणाले.

त्यांनी पुढे असा दावा केला की डीजीपी राजीव कुमार यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. “पोलिसांवर इतके गंभीर हल्ले होऊनही, वरिष्ठ अधिकारी उदासीन दिसत आहेत. मुर्शिदाबादमधील जातीय तणावादरम्यान पूर्वी दिलेल्या आदेशानुसार, मी उद्या कोलकाता उच्च न्यायालयात तातडीने हस्तक्षेप आणि केंद्रीय सैन्याची मागणी करणार आहे.”

भाजप आयटी सेल प्रमुखांनी एक्स वर पोस्ट करताना असेही म्हटले आहे की, “पश्चिम बंगाल पुन्हा एकदा जातीय आगीत जळत आहे आणि हिंदू लक्ष्य आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी गप्प आहेत.”

हे ही वाचा :

अमेरिकेकडून पाक जनरल असीम मुनीर यांना लष्कर दिनाचे आमंत्रण!

NSE ला मासिक वीज फ्युचर्स सुरू करण्यासाठी ‘सेबी’ कडून हिरवा कंदील

रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल होणार

‘ऑपरेशन शरद पवार’ यशस्वी इंडी आघाडीचे विमान पाडले!

दरम्यान, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) भाजपचे दावे फेटाळून लावले आणि पक्षावर स्थानिक वादाचे राजकारण करण्याचा आरोप केला. “परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. पोलिसांनी जलद आणि कठोरपणे कारवाई केली. दुकान उभारण्यावरून झालेल्या वादाला भाजप जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे,” असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा