29.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरक्राईमनामाहत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

प्रसारमाध्यमांत देण्यात आलेल्या फोटोमुळे निर्माण झाला संभ्रम

Google News Follow

अलीकडेच मुंबईतील अंधेरी येथील जुहू परिसरात राहणाऱ्या एका महिलेची हत्या झाल्याची बातमी आगीसारखी पसरली होती. त्यामध्ये महिलेची हत्या तिच्या मुलाने केल्याचा आरोप करण्यात आला होता. या हत्येमध्ये वीणा कपूर नावाच्या मृत महिलेच्या मुलाला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील नवा पेच समोर आला आहे, ज्या मृत महिलेचा फोटो प्रसारमाध्यमांमध्ये व[परण्यात आला होता. ती दुसरीच महिला असल्याचे समोर आले आहे. वीणा कपूर नावाची ही महिला गोरेगावमध्ये राहते आणि ती जिवंत आहे. ती तिचा मुलगा अभिषेक चढ्ढासोबत राहते.

हे ही वाचा:

मुख्तार अन्सारीला १० वर्षाची सजा

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

शिवसृष्टीसाठी सरकारचे लाखमोलाचे सहाय्य

ओसामा बिन लादेनचे स्वागत करणाऱ्यांनी उपदेश करू नयेत

अडचण अशी आहे की, मीडियामध्ये तिचा फोटो दाखवल्यानंतर लोक तिला फोन करून विचारुपूस करत आहेत. तर काही लोक दु:ख व्यक्त करत आहेत तर नातेवाईकांसह इतर मंडळी समाजमध्यमांवर जीवंतपणीच श्रद्धांजली वाहत आहेत. पीडित महीलेने मालाड येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पीडित महिलेने लोकांना आवाहन केले आहे की, ती जिवंत आहे आणि ती देखील वीणा कपूर आहे पण ती गोरेगावमध्ये आपल्या मुलासोबत जुहू नव्हे तर अंधेरी येथे राहते.

घडले खरे तर ज्या वीणा कपूरची हत्या झाली ती देखील अभिनेत्री होती आणि ही वीणा कपूर देखील अभिनेत्री आहे. दोघींनी पंजाबी मालिकेत काम केले आहे. कदाचित त्यामुळे मीडियाला समजण्यात चूक झाली असावी आणि मृत वीणा कपूरऐवजी जिवंत वीणा कपूरचा फोटो वापरला गेला. त्यामुळे जीवंत वीणा कपूरला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा