31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरक्राईमनामाकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा निषेध

Google News Follow

Related

‘माय महानगर’चे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे आणि इतर नेते सोमवार, ५ जून रोजी मंत्रालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. त्यावेळी प्रतिनिधी स्वप्निल जाधव हे प्रणिती शिंदे यांची बाईट घेत होते. त्या बाईटचे थेट प्रक्षेपण सुरू होते, त्यावेळी आमदार झिशान सिद्दीकी तेथे आले आणि प्रणिती शिंदेंना बोलवू लागले. तेव्हा जाधव यांनी त्यांना हात लावून बाजूला होण्याची विनंती केली.

हे ही वाचा:

गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले

मात्र, प्रणिती शिंदे यांचा बाईट घेऊन झाल्यावर संतापलेल्या सिद्धीकी यांनी स्वप्नील जाधव यांना धमकी दिली. ‘तू मला ओळखतोस ना, पुन्हा असे केले तर हात काढून हातात देईन,’ अशी धमकी त्यांनी जाधव यांना दिली. आमदार झिशान सिद्दीकी यांची ही भाषा धक्कादायक, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने एका पत्रकाद्वारे केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा