29.1 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामालैंगिक छळाच्या आरोपांनंतर काँग्रेस खासदार प्राध्यापकाला जेएनयूतून हाकलले

लैंगिक छळाच्या आरोपांनंतर काँग्रेस खासदार प्राध्यापकाला जेएनयूतून हाकलले

जेएनयुच्या विद्यार्थिनींनी केली होती तक्रार

Google News Follow

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) काँग्रेसचे खासदार आणि प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या तक्रारी केल्या होत्या. यानंतर आरोपांप्रकरणी चौकशीनंतर अकोइजम यांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यापीठाने ९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, त्यांची हकालपट्टी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

अकोइजम हे मणिपूरमधील इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार आहेत. ते जेएनयुच्या सामाजिक विज्ञान शाखेअंतर्गत ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल सिस्टिम्स’ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. माहितीनुसार, विद्यापीठातील ११ विद्यार्थिनींनी त्यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने चौकशी केली. समितीने आपल्या निष्कर्षांच्या आधारे अकोइजम यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली होती.

विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी या कारवाईचा आदेश जारी केला. उपलब्ध तथ्यांचा विचार करून आणि निर्धारित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर अंतर्गत समितीच्या अहवालानुसार सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईसाठी विद्यापीठाच्या सेवा नियमांचाही आधार घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत समितीचा अहवाल मांडण्यात आला होता. त्यानंतर अकोइजम यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

१० ऑक्टोबरच्या कॉकरोचच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

२ ऑक्टोबरपासून दिल्ली पोलिसांकडून २५ एफआयआर

गोदावरी नदीकाठावरील अनधिकृत मजार हटवली

फेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड

माहितीनुसार, या तक्रारी मे २०२६मध्ये झालेल्या तोंडी परीक्षांनंतर (व्हायवा) समोर आल्या होत्या. लैंगिक संबंध किंवा अन्य लैंगिक मागण्यांच्या बदल्यात जास्त गुण देण्याचे आमिष दाखवल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. काही विद्यार्थिनींना प्राध्यापकाच्या कॅम्पसमधील निवासस्थानी बोलावून अनुचित वर्तन केल्याचेही तक्रारींमध्ये नमूद आहे. या प्रकरणाची सुरुवात एका विद्यार्थिनीने तिचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यानंतर झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इतर विद्यार्थिनींनीही आपल्यासोबत अशाच प्रकारचे वर्तन झाल्याचे सांगितले. पुढे मे महिन्यात या तक्रारी जेएनयुच्या अंतर्गत तक्रार समितीकडे सादर करण्यात आल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा