30.9 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरक्राईमनामाकर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

हिंदू संघटनांच्या सतर्कतेनंतर बस पोलिसांच्या ताब्यात

Google News Follow

कर्नाटकातील चिक्कमगलूरू जिल्ह्यात, अंडरवर्ल्ड गुंड आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांमधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा गौरव करणारे स्टिकर्स आणि घोषणा लावलेली बस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही बस अडवून चिक्कमगलूरू शहर पोलिसांच्या ताब्यात दिली. केरळम येथील ही एक खाजगी पर्यटक बस असल्याचे समोर आले आहे.

संबंधित बसवर “दाऊद: डॉनचा उदय” (Dawood: rise of a don) आणि “सम्राटाचा पुन्हा हल्ला” (emperor strikes again) यांसारखे प्रक्षोभक संदेश असलेले स्टिकर पूर्ण बसवर लावले होते. या घोषणांमधून फरार गुंड आणि भारताने घोषित केलेल्या दहशतवाद्याला एक नायक म्हणून चित्रित केले होते. चिक्कमगलूरू शहरातील बोलारामेश्वर मंदिराच्या जवळील परिसरात बस असताना हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात हे स्टिकर्स आले. यानंतर त्यांनी वाहन थांबवले आणि चालक व क्लिनरला त्या संदेशांबद्दल जाब विचारला. प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपासणीसाठी कागदपत्रांसह बस ताब्यात घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

भाजप युवा मोर्चाने या घटनेबाबत टीका करत सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. चिक्कमगलुरूला पोहोचण्यापूर्वी केरळमची बस अनेक पोलीस तपासणी नाके कसे पार करू शकली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संघटनेने या घटनेला सुरक्षेतील गंभीर त्रुटी म्हटले असून, गुन्हेगार आणि राष्ट्रविरोधी घटकांचे उदात्तीकरण करणारे संदेश प्रदर्शित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास तीव्र आंदोलने करण्याचा इशाराही दिला आहे.

हे ही वाचा:

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी

१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी ठाकुर्लीतून अटकेत

तामिळनाडूमध्येही घडली होती अशीच घटना

सहा महिन्यांपूर्वी अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली होती. कोईम्बतूरहून आलेल्या एका पर्यटक बसवर कर्नाटकातील त्याच चिक्कमगलूरू जिल्ह्यात दाऊद टोळीला पाठिंबा देणारे स्टिकर्स आणि मजकूर आढळून आला होता. हिंदू कार्यकर्त्यांनी यापूर्वीच्या घटनेचा संदर्भ देत, केरळमहून येणाऱ्या दुसऱ्या बसला असे संदेश लावून प्रवास करण्याची परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा