28.7 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारणशरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

तीन दिवसांच्या उपचारांनंतर घरी परतले

Google News Follow

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालयात दाखल असताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.

शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून बुधवारी (४ नोव्हेंबर) डिस्चार्ज देण्यात आला होता. खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना २ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा:

निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी

१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी ठाकुर्लीतून अटकेत

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

व्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जय पवार यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. त्यांच्यासोबतच सुनेत्रा पवार यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा