29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामालालबागमध्ये सापडला महिलेचा पिशवीत कोंबलेला मृतदेह, उडाली खळबळ

लालबागमध्ये सापडला महिलेचा पिशवीत कोंबलेला मृतदेह, उडाली खळबळ

मृत महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आले समोर

Google News Follow

Related

मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत ५०ते ५२ वय असलेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

सदर मृतदेह महिला राहत असलेल्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेची माहिती रात्री उशिरा पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी कपाटाच्या आतील पिशवी काढून ती उघडली, तेव्हा त्यामध्ये सुमारे ५० ते ५२ वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा:

पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

चीन-पाक निर्मित JK 17 एअरक्राफ्ट खराब, म्यानमारला केला जात होता पुरवठा

इम्रान खान यांच्या अटकेच्या तयारीमुळे पाकिस्तानात घमासान

काळाचौकी पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. वीणा प्रकाश जैन असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता.

एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, हात पाय असे शरीराचे अनेक भाग कापण्यात आले होते असे कळते. रात्री उशिरा फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करून संपूर्ण फ्लॅटचा पंचनामा करण्यात आला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली की, काळाचौकीत एका सिंगल रूममधून मृतदेह मिळाला आहे. ९ वाजता बेपत्ता असल्याची तक्रार झाली होती. त्यासंदर्भात पोलिस तिथे गेले. तेव्हा त्यांना मृतदेह मिळाला. पुढील तपास सुरू आहे. प्लॅस्टिक बॅगमध्ये हा मृतदेह मिळाला. हे कुणी केले हे लवकरच कळेल. त्यांची मुलगी तिथेच होती. तिची चौकशी केली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा