28.2 C
Mumbai
Thursday, August 13, 2026
घरक्राईमनामामहापालिका कर्मचारी धीरज परदेशीची मुस्लिमांकडून निर्घृण हत्या

महापालिका कर्मचारी धीरज परदेशीची मुस्लिमांकडून निर्घृण हत्या

घटनेनंतर अहिल्यानगर मध्ये प्रचंड तणाव

Google News Follow

Related

 अहिल्यानगरच्या मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात पथदिव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचारी धीरज कचरूसिंग रजपूत (परदेशी) यांची हत्या काही स्थानिक मुस्लिमांनी केल्याचे प्रकरण  उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.  यातील सगळ्या आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक केली

पळलेल्या तीन मुख्य आरोपींची गचांडी अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आवळली. हे आरोपी हैदराबादमध्ये पळून गेले होते. आरोपींना पळून जाण्यास मदत करणार्‍या आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.

 धीरज परदेशी यांच्यासह अक्षय मुळे सहकार्‍यांना घेऊन दर्गा दायरा परिसरात पथदिव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकीम अस्लम सय्यद, युनूस शेख आणि अन्य दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात धीरज परदेशी गंभीर जखमी झाले आणि उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना फरार आरोपींचा  शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.

तपासात हे स्पष्ट झाले की, मुख्य आरोपी हैदराबादमध्ये लपून बसलेले आहेत. माहिती मिळाल्यावर विशेष पथक तातडीने हैदराबादकडे रवाना झाले. हैदराबाद शहर पोलिसांच्या कमिशनर टास्क फोर्स आणि खैरताबाद झोनच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय 20), मेहराज इब्राहिम सय्यद (वय 22) आणि सिराज इब्राहिम सय्यद (वय 21, तिघेही रा. आलमगीर मदरशाजवळ, भिंगार) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी हल्ल्यात सहभागाची कबुली दिली. हल्ल्यानंतर सदर आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने हैदराबादला गेले.

हे ही वाचा:

सिराजची ‘षटकारांची हॅट्ट्रिक’; भारताचा विजयाचा सराव

सडलेले मांस, मुदतबाह्य दूध; बंगळुरूमधील पबवर कारवाई

झारखंडमध्ये संघर्ष तीव्र; सीबीआय चौकशी हवीच!

नंबर वन सबालेन्काचा ‘गेम ओव्हर’!

दरम्यान, आरोपींना शहराबाहेर पळून जाण्यास कोणी मदत केली, याचा तपास सुरू असताना ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद (वय ५२, रा. आलमगीर) आणि वसीम रहिम सय्यद (वय ४७, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनी आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा