31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरक्राईमनामानार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि...

नार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि…

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणाऱ्या ड्रग तस्कराची एवढी मजल गेली की, त्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

एनसीबीने नवी मुंबईत कारवाई करुन या ड्रग तस्कराला अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग तस्कराचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल १०२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

कोलंबिया ते मुंबई तसेच इथोपिया या कोकेनच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत याचा महत्त्वाचा वाटा होता. ही कारवाई करीत असताना टोनी याने एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला केला. यामध्ये एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टोनी याला शोधण्याचा गेले कित्येक दिवस एनसीबीचा प्रयत्न होता. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई तसेच दिल्ली येथे टोनीचा शोध घेतला जात होता.

स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियात पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा आहे. अलिकडेच तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर ३० येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करीत त्याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त केले.

हे ही वाचा:
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?

लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया

भंडाऱ्या पाठोपाठ आणखी एक जिल्हा कोरोनामुक्तीकडे

अरे बापरे!! खड्ड्यांमुळे रोज जातात एवढे बळी

शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्‍यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली असून २०२१ मध्ये आतापर्यंत २२ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा