34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरक्राईमनामाठाण्यात 'व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम'ची नशा!

ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!

Related

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील रेव्हपार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर मुंबई आणि उपनगरांना बसलेल्या अमलीपदार्थांच्या (ड्रग्स) विळख्याचा प्रश्न पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. गेल्या २५ दिवसांमध्ये पोलिसांनी शहरभर छापे टाकून ६८ लाख सात हजार ४९८ रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये विदेशी बनावटीचे अमलीपदार्थ जास्त आहेत. यामागे कोणी मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाण्यामधील पान शॉप, छोट्या टपऱ्या येथे सर्रास अमलीपदार्थांची विक्री केली जाते. विदेशी बनावट अमलीपदार्थ अधिक असल्यामुळे आणि भारतात बंदी असूनही हे पदार्थ कसे येतात, हा पोलीसांपुढील सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांखालील मुलेही या व्यसनांना बळी पडत असल्याचे समोर आले आहे. अमलीपदार्थ म्हटले की, नेहमीची नावे आणि त्यांच्या बद्दल कल्पना असते. मात्र, व्हाईटनर, वेदनाशमक मलमे, नेलपेंट रिमूव्हर, बुक, केटामाईन, हेअर स्प्रे, मॅजिक मशरूम, डिओडरंट या नावांची पावडर शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये नशेसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार करणारे चार आरोपी मुंबई आणि इगतपुरीचे

काय होणार भारत-चीन दरम्यानच्या १३व्या चर्चेत?

शिष्यवृत्तीच नाही, फिजिओथेरपिचे निवासी डॉक्टरही संपावर

कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?

सध्या ठाण्यात छापेमारी सुरू असून अमलीपदार्थांचा साठा जप्त केला आहे. अनेक विदेशी बनावटीचे पदार्थ येत असतात. आरोपी कारवाईपासून वाचण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. तरीही पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ड्रग्स माफियांकडून तरुणांना खास लक्ष्य केले जाते. सुरुवातीला तरुण मौज म्हणून व्यसन करत असतात. त्यानंतर ते व्यसनाच्या आहारी जातात आणि पालकांचेही दुर्लक्ष होते. मानसिक तणावावरील उपाय म्हणून ही अनेकदा तरुण व्यसनाच्या मार्गावर जातात. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा