32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामागँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच

गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच

Google News Follow

Related

सक्तवसुली संचालनालयाने केली कारवाई

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाच्या नावावर असलेली वरळीतील सीजे हाऊस मधील संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे. सीजे हाऊसचे बांधकाम केंद्रातील एका नेत्याशी संबंधित होते. या नेत्याची ईडीकडून  याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या २०० कोटींच्या व्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने २०१९ मध्ये इक्बाल मिर्चीचे कुटुंब आणि इतरांवर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकणात मिर्ची याचे दोन सहकारीसह तीन बांधकाम व्यावसायिक याना देखील ईडीने अटक केली होती.

मुंबईतील वरळी भागात सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन हे १५३७ चौरस मीटरची जागा खरेदी करताना या जागेचा गैरव्यवहार झाला होता, एका ट्रस्टच्या नावावर असलेली ही मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नावावर करून देण्यासाठी तसेच मालमत्ता खरेदी करताना हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा यांची महत्वाची भूमिका होती. इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन आणि तिची दोन मुले असिफ आणि जुनैद यांनी सिजे हाऊसमध्ये दोन मजले खरेदी केले होते. एका खाजगी कंपनीला ते भाडेतत्वावर देण्यात आले होते. ईडीने त्या कंपनीला विनंती करून ती जागा ताबडतोब खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी त्याचा ताबा ईडीने घेतला आहे.

यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीच्या एकूण ७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये पाचगणी, महाबळेश्वर मधील एक हॉटेल, एक निर्माणाधीन हॉटेल, एक सिनेमा हॉल, १ फार्म हाऊस, २ बंगले आणि साडेतीन एकर जागेचा समावेश आहे. २०१३ मध्ये इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू झाला आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी आणि दोन मुलांविरूद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि त्याचे दोन मुलगे आसिफ आणि जुनैद हे ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, मुंबईच्या न्यायालयाने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबातील तीन सदस्यांना (पत्नी आणि दोन मुलगे) फरारी घोषित केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा