मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईला वेग आला आहे. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर एक मृतदेह सापडला असून नक्षलवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस, हॉक फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत नक्षलवाद्यांशी चकमक झाली.
रविवारी रात्री उशिरा कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात गुओत माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत होती. यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. यामध्ये एक मृतदेह सापडला आणि दोन नक्षलवादी साथीदारांना अटक करण्यात आली.
सुरक्षा दलांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात चकमक झाली. मांडलाचे पोलिस अधीक्षक (एसपी) रजत सकलेचा म्हणाले, “खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आमचे पथक शोध मोहिमेसाठी जंगलात गेले. या दरम्यान, पोलिस, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त, नक्षलवाद्यांना रेशन देण्यासाठी आलेल्या दोन नक्षलवादी साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे.”
मांडलाचे पोलिस अधीक्षक रजत सकलेचा पुढे म्हणाले की, या चकमकीत सुमारे २० नक्षलवादी सहभागी होते. हॉक फोर्स, जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफ जवान या पथकात होते. या प्रकरणाची पुढील कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच अधिक तपशील दिला जाईल.”
हे ही वाचा..
२०० मान्यवरांनी केले पंतप्रधान मोदींचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत
कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठात ‘फ्री पॅलेस्टाईन’, ‘आझाद काश्मीर’ लिहिलेले भित्तिचित्र
मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करणार
श्रीजेश, सविता, हरमनप्रीत यांचे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन
केंद्र सरकारच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त भागात नाक्षवाद विरोधी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा उद्देश ठेवण्यात आला असून यासंबंधी अनेकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इशारा दिला आहे. याचं पार्श्वभूमीवर कारवाईला वेग आला असून विविध ठिकाणी होत असलेल्या चकमकींमध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा केला जात असून त्यांचे तळही उध्वस्त केले जात आहेत.