28 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरक्राईमनामाचैतन्यानंद सरस्वतीच्या फोनमध्ये सापडली अनेक रहस्ये

चैतन्यानंद सरस्वतीच्या फोनमध्ये सापडली अनेक रहस्ये

पोलिसांकडून चौकशी सुरू

Google News Follow

Related

दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या खाजगी संस्थेतील १७ विद्यार्थ्यांनी लैंगिक छळ केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर संचालक चैतन्यानंद सरस्वती यांना अटक करण्यात आली. यानंतर आता ६२ वर्षीय सरस्वती यांच्या फोनवर अनेक महिलांशी केले चॅटिंग मेसेजेस आढळले आहेत.

चॅट्सच्या पोलिस तपासात असे दिसून आले की, चैतन्यानंद सरस्वती यांनी खोट्या आश्वासनांनी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या डिव्हाइसमध्ये एअर होस्टेससोबतचे त्यांचे अनेक फोटो आणि महिलांच्या डिस्प्ले फोटोंचे स्क्रीनशॉट होते, असे पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. चैतन्यानंद सरस्वती यांच्या दोन महिला सहकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू असून यांनी पीडितांना धमकावले होते, त्यांना अश्लील संदेश हटवण्यास भाग पाडले होते. या दोन्ही सहाय्यक खाजगी संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम करत असून सध्या तपासाचा भाग म्हणून त्यांची चौकशी केली जात आहे.

वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्चचे माजी अध्यक्ष आणि स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद सरस्वती यांच्या विरोधात छेडछाड, फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली अनेक एफआयआर दाखल होते. त्यांना अखेर आग्रा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नसून तपासकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच त्यांना त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झालेला नाही आणि ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पुरावे समोर येऊनही, ते चौकशीदरम्यान तपासकर्त्यांशी वारंवार खोटे बोलत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्यात संस्थेच्या प्रशासकाकडून चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये संस्थेत EWS शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत PGDM अभ्यासक्रम घेत असलेल्या महिला विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे ही वाचा : 

देवनार-मानखुर्द जन्म प्रमाणपत्र घोटाळा: १०३ जणांना बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित

खान नगर पूजामंडपात ‘ऑपरेशन सिंदूर’ आधारित दुर्गापूजा; भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन!

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर द्यायचे होते पण… काय म्हणाले पी चिदंबरम?

गाझासाठी अमेरिकेची शांतता योजना, मोदींनी स्वागत करत म्हटले-‘व्यवहार्य मार्ग’

पोलिसांनी पुढे सांगितले की चौकशीदरम्यान, ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले, त्यापैकी १७ जणींनी आरोपीने अपशब्द वापरल्याचा, अश्लील व्हॉट्सअप, एसएमएस संदेश पाठवल्याचा आणि चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला. पीडितांनी पुढे आरोप केला आहे की, प्राध्यापक/प्रशासक म्हणून काम करणाऱ्या महिलांनी आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले आणि दबाव आणला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा