29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषदेवनार-मानखुर्द जन्म प्रमाणपत्र घोटाळा: १०३ जणांना बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित

देवनार-मानखुर्द जन्म प्रमाणपत्र घोटाळा: १०३ जणांना बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती 

Google News Follow

Related

एम/पूर्व विभागातील मानखुर्द महापालिका कार्यालयात मोठा जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. प्रशासनाकडून केवळ ३ लोकांची विलंबित जन्म नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात १०३ जणांची बेकायदेशीरपणे जन्म नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्रे जारी करण्यात आली, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी ते आज (३० सप्टेंबर) देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, एम/ पूर्व महापालिका कार्यालय, मानखुर्द द्वारा १०३ लोकांची बेकायदेशीररित्या विलंबित जन्म नोंदणी करण्यात आली, त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी स्वतः माइया सहयोगीसह उद्या दि. ३० सप्टेंबर रोजी १२ वाजता देवनार पोलीस स्टेशनला भेट देणार आहे.

हे ही वाचा : 

खान नगर पूजामंडपात ‘ऑपरेशन सिंदूर’ आधारित दुर्गापूजा; भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन!

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर द्यायचे होते पण… काय म्हणाले पी चिदंबरम?

गाझासाठी अमेरिकेची शांतता योजना, मोदींनी स्वागत करत म्हटले-‘व्यवहार्य मार्ग’

दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे भासवून ७० लाखांची फसवणूक

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व कुर्ला तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, मानखुर्द, गोवंडी व देवनार परिसरातील विलंबित जन्म नोंदणीसाठी फक्त ३ व्यक्तींच्या नोंदणीस अधिकृत परवानगी दिली होती. मात्र, मानखुर्द पूर्व (एम/पूर्व) महापालिका कार्यालयाने यावर्षी २०२४ मध्ये तब्बल १०३ जणांची नोंदणी करून त्यांना जन्म प्रमाणपत्रे जारी केली आहेत. म्हणजे मानखुर्द महापालिका विभागाने १०३ अपात्र पुसखोर लोकांना बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा