29 C
Mumbai
Saturday, February 28, 2026
घरक्राईमनामाजुहूमध्ये बनावट सोन्याच्या गहाण कर्जाचा घोटाळा

जुहूमध्ये बनावट सोन्याच्या गहाण कर्जाचा घोटाळा

IIFL फायनान्सची ३५ लाखांची फसवणूक

Google News Follow

Related

मुंबई : जुहू परिसरात बनावट सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज उचलून नामांकित वित्तसंस्थेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुहू तारा रोड येथील IIFL फायनान्स लिमिटेडच्या शाखेत बनावट ९१६ हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून तब्बल ३४ लाख ८० हजार २५९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

IIFL फायनान्सचे प्रादेशिक व्यवस्थापक नौशाद अहमद इद्रीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ ते २१ जून २०२५ या कालावधीत जुहू शाखेत सोन्याच्या कर्जामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर कंपनीने अंतर्गत लेखापरीक्षण केले. या तपासणीत सहा ग्राहकांनी संगनमताने ५३४.११ ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलल्याचे उघड झाले.

हे ही वाचा:
बदलापूरातील नराधमाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

भारताच्या विदेशी चलन साठ्यात मोठी झेप

मुस्लिम महिलेने पतीला गो- तस्करीच्या कटात गोवले, प्रियकराला अटक

पाकिस्तानमध्ये जिहादी आणि सांप्रदायिक दहशतवादी गट येतायत एकत्र!

तपासात हे दागिने सोन्याचा मुलामा दिलेले असून त्यावर खोटे “९१६ हॉलमार्क” लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शाखेतील कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाली. संबंधित ग्राहकांना दागिने सोडविण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला, तसेच कंपनीला कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात अदनान उमर शेख, अलिसान नेल्सन कास्टन, अझीम रिझवान शेख, मानव अमित गौर, संजना विलास पवार आणि सोहेल जब्बार शेख अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, या घोटाळ्यात कंपनीतील कोणत्याही कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमुळे सोन्याच्या कर्ज व्यवहारातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आर्थिक संस्थांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा