26 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरक्राईमनामामुंबईत पोलिसांच्या वेशात केनियन महिलेची केली ६६ लाखांची लूट

मुंबईत पोलिसांच्या वेशात केनियन महिलेची केली ६६ लाखांची लूट

पोलिसांनी केली अटक, सगळा ऐवज केला जप्त

Google News Follow

Related

पोलिसांच्या नावाखाली परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला माता रमाबाई आंबेडकर (एम.आर.ए.) मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. केनियन महिला पर्यटकाला पोलीस असल्याची बतावणी करून तिची ६६ लाख ४५ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या या आरोपीकडून पोलिसांनी ७९ लाखांहून अधिकची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

२७ जानेवारी रोजी दुपारी फोर्ट परिसरातील एम.जी. रोडवर ही घटना घडली. तक्रारदार सुमय्या मोहम्मद आब्दी (वय २६) या केनियन महिला नागरिक टॅक्सीने जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांनी टॅक्सीची तपासणी करण्याच्या बहाण्याने सुमय्या यांच्याकडील ६६ लाख ४५ हजार रुपये असलेली बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगून आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

हे ही वाचा:

अँड्रॉइड ऍप ‘विंगो’ घोटाळा; फसवणूक करणारे ऍप, टेलिग्राम चॅनेल ब्लॉक

“इराणविरुद्ध कारवाई करण्यास अमेरिकन सैन्य तयार”

भारत–युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक व्यापार करार

चांदीने गाठला ४ लाखांचा टप्पा!

परदेशी महिलेची फसवणूक झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सुरज देवरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील ५० ते ६० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध लावून ठाणे येथील त्याच्या राहत्या घराबाहेर सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश रंगनाथ चव्हाण (वय ४८, रा. ठाणे) असे असून तो मूळचा जालना जिल्ह्यातील बदनापूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम ७९,३५,८०० रुपये,गुन्ह्यात वापरलेली होंडा ट्रिगर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१९(८), २०४ आणि ३(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा