29 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरक्राईमनामाभेसळीवर FDAचा राज्यभर धडाका; पारशी डेअरीचा परवाना निलंबित

भेसळीवर FDAचा राज्यभर धडाका; पारशी डेअरीचा परवाना निलंबित

१.९० कोटींचा साठा जप्त

Google News Follow

Related

राज्यातील अन्न भेसळ आणि अस्वच्छ अन्ननिर्मितीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत मुंबईतील नामांकित पारशी डेअरी फार्म प्रा. लि. चा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. याशिवाय पालघरमधील कंपनीच्या केंद्रावर छापा टाकून लाखो रुपयांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. राज्यभरातील कारवायांमध्ये एकूण १ कोटी ९० लाख ७५ हजार ८४५ रुपयांचा भेसळयुक्त व संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आल्याने अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट, मरीन लाईन्स येथील पारशी डेअरी फार्मच्या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळले. कच्च्या दुधासाठी आवश्यक ‘रॉ मिल्क रिसेप्शन डॉक’ नसणे, उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशी, कच्चा माल थेट जमिनीवर साठवणे, माशांचा वावर तसेच उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने कंपनीचा परवाना तातडीने निलंबित केला.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील केंद्रावरही कारवाई करत ५,९९९ किलो कुकिंग देसी काऊ बटर, पनीर आणि लेबल नसलेले कोलोस्ट्रम असा ३२ लाख १० हजार ७४१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. राज्यव्यापी मोहिमेदरम्यान अकोला येथे प्रतिबंधित अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून १.२३ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गोरेगावमध्ये दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर गोवंडीतील मेसर्स सूफी डेअरी येथून १,६८३ लिटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. या विशेष मोहिमेत राज्यभरातून २,३१७ लिटर दूध, ३० लिटर रिफाइंड खाद्यतेल आणि ६,८४९ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत १ कोटी ९० लाख ७५ हजार ८४५ रुपये इतकी आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य नितीश कौशल अटकेत

चर्चेचे दरवाजे खुले ठेवून अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच

‘आम्हाला काहीच फुकट मिळालेलं नाही’!

१५०० रुपयांची उधारी आणि कौटुंबिक वाद; मित्रानेच काढला मित्राचा काटा

दरम्यान, अन्न भेसळीबाबत नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविता याव्यात यासाठी FDAने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘फूड अँड ड्रग ग्रीव्हन्स पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तसेच व्हॉइसच्या माध्यमातूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा