31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरक्राईमनामा‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाममध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तब्बल पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुरुवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू होती. अखेर सुरक्षा दलाला शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी मोठे यश मिळाले आहे. तसेच ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ही चकमक सुरू झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. डीएच पोरा भागातील सामनो पॉकेटमध्ये ही चकमक झाली. त्यात राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचा देखील समावेश होता. घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान हे दहशतवादी मारले गेल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी १५ नोव्हेंबरलाही सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन काली’ सुरू केले होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बशीर अहमद मलिकसह दोन जण ठार झाल्याचे लष्कराने सांगितले होते. हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

हे ही वाचा:

वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?

अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, “कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने पाच दहशतवाद्यांना ठार केले आहे. शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. सध्या संपूर्ण परिसराचा शोध सुरू आहे. ही कारवाई कालच सुरू झाली होती, मात्र रात्री काही काळ थांबवण्यात आली.” दहशतवाद्यांच्या घराला आग लावण्यात आली होती. घराला आग लागल्यानंतर दहशतवाद्यांना बाहेर पडावे लागले आणि सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा