25 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरक्राईमनामाआजार बरा करण्याचे आमिष दाखवत विधवा महिलेचे जबरदस्ती धर्मांतर!

आजार बरा करण्याचे आमिष दाखवत विधवा महिलेचे जबरदस्ती धर्मांतर!

Google News Follow

Related

बळजबरीने दमदाटी करून धर्मांतर करण्याचा प्रकार अहमदनगर पुढे आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे हा प्रकार घडला आहे. ५५ वर्षीय विधवा महिलेला फूस लावून जबरदस्ती त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न एका ख्रिश्चन धर्मगुरू मार्फत करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहणाऱ्या मिराबाई सुभाष हरेल या ५५ वर्षीय विधवा आहेत. मुलगा, सून, नातू असा त्यांचा परिवार कामानिमित्त बाहेरगावी असतो. तर गावात त्यांचा स्वतःचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. नगर जिल्ह्यात पंजाब येथून आलेला ख्रिश्चन धर्मगुरू कमल सिंग हे एक दिवस मीराबाई यांच्या भाजी विक्रीच्या गाडीवर आले. यावेळी त्याने स्वतःची एक मोठा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख करून दिली. गोरगरिबांची मदत करतो असे सांगण्यात आले. तर मला काही आजार आहे का? पैशांची अडचण आहे का? असे विचारले.

रविवारी माझ्याकडे या, मी तुमचा आजार बरा करतो तसेच दरमहा तुम्हाला दोन हजार रुपयांची मदत करतो असे आमिषही दाखवले. याच बोलण्याला भूलून मिराबाई या रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ब्राह्मणी गावातील तळ्याजवळ गेल्या. यावेळी त्यांना एक तेल देण्यात आले. हे तेल भगवान येशूच्या आशीर्वादाने मंतरलेले तेल असल्याचे सांगितले गेले. हे तेल लावल्यावर तुम्हाला त्वरित आराम मिळेल असे सांगितले गेले. तेलाची बाटली घेत त्यावर काहीतरी मंत्र पुटपुटून ती बाटली मीराबाई यांना देण्यात आली. तर या सगळ्या दुखण्यातून कायमचे बरे होण्यासाठी त्यांना आंघोळ करावी लागेल असे सांगितले गेले.

हे ही वाचा:

ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI

अनुराधा पौडवाल म्हणतात, फक्त भारतातच दिसतात अजानचे लाऊडस्पीकर

मी मंत्रोच्चार करेन आणि तुम्ही कायमच्या बरे व्हाल असे कमल सिंग याने सांगितले. तळ्यातील गुडघ्याभर पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेले असता कमल सिंग याने अचानक पाठीमागून येऊन मीराबाई यांच्या दोन्ही खांद्यांना धरून त्यांना बळजबरीने पाण्यात बसवले. तीन चार वेळा असे करण्यात आले. त्यानंतर चुकीच्या प्रकारे त्यांचा अंगाला अंग घासण्यात आले. स्वतःला कमल सिंग यांच्या तावडीतून सोडवून घेण्यासाठी मिराबाई प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांना यश येऊन त्या पाण्याबाहेर आल्या आणि तात्काळ घराकडे निघाल्या त्यावेळी त्यांना अडवून मोठ्यांनी हालेलुया असा जयघोष करण्यात आला.

मिराबाई ख्रिश्चन झाल्याचे कमल सिंग याने जाहीर केले. त्यांच्या गळ्यातल्या आणि कानातले दागिने काढायला सांगितले. मीराबाई यांना धर्मांतर करायचे नव्हते पण तरी देखील त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत त्यांचे धर्मांतर करण्यात आले. त्यांना दमदाटी करून त्या क्रिश्चन झाल्याचे सांगण्यात येत होते. हा सर्व प्रकार गावकर्‍यांनी पाहून तिथे जमा झाले. त्यांनी कमल सिंग आणि त्याच्या साथीदारांना जाब विचारला आणि सर्व प्रकारचा विरोध केला. तर त्यानंतर तात्काळ पोलिसांना फोन करून बोलावले गेले.

राहुरी पोलीस स्टेशन मध्ये मदत मागायला गेले असता मीराबाई यांना दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तुमची तक्रार लिहून घेण्याचे सांगून त्यांना बसवून ठेवले होते. तर तोपर्यंत समोरची पार्टी पोलीस स्टेशनला दाखल होऊन मीराबाई यांनी तक्रार केली. तर त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. अटक नको असेल तर त्यांना कोऱ्या कागदावर सही करण्यास भाग पाडण्यात आले. पण असे असले तरी मिराबाई या सर्व प्रकारातून सावरु शकत नव्हत्या. म्हणून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधत ५ एप्रिल रोजी स्वतःची तक्रार दाखल केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा