29.4 C
Mumbai
Saturday, May 2, 2026
घरक्राईमनामा४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

पुण्यातील भोर तालुक्यातील धक्कादायक आणि संतापजनक घटना

Google News Follow

Related

पुण्यातील भोर तालुक्यातून धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं. तसेच हे विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. दरम्यान, आरोपी विरोधात १५ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलीय. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे सुट्टी निमित्त राहावयास आली होती. दुपारच्या सुमारास नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत असताना तिला आमिष दाखवून तिथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन आरोपीने निर्दयीपणे अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने तिची हत्या केली.

हे ही वाचा:

भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

महाराष्ट्र म्हणजे शौर्य, भक्ती, सुधारणा, राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम!

‘आप’चे मुख्यमंत्री भगवंत मान झिंगलेल्या अवस्थेत?

सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी शोध घेतला. मुलगी सापडत नसल्याने परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तपास केला असता सदर व्यक्ती समवेत ती एका आडबाजूला जात असल्याचे दिसले. यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा एका गोठ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. यावरून नागरिकांनी ज्या व्यक्ती बरोबर ती गेली होती त्या व्यक्तीचा शोध गावाच्या परिसरात घेण्यास सुरुवात केली व तो गावच्या नदीकडील भागात सापडला. दरम्यान, त्याला पकडून आणून मुलगी कुठे आहे? तु काय केलस? असे विचारले असता त्याने मी काही केले नाही असे उत्तर दिले. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार समोर आला. यावर संतप्त नागरिकांनी नराधमास आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा