33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरक्राईमनामासुजित पाटकर यांच्या विरोधात गुन्हा; संजय राऊत यांच्यासमोर जम्बो अडचण

सुजित पाटकर यांच्या विरोधात गुन्हा; संजय राऊत यांच्यासमोर जम्बो अडचण

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

Google News Follow

Related

कोविड काळात बनावट भागीदारी डीड तयार करून आणि पुण्यातील जम्बो कोविड केंद्राच्या बांधकामाची निविदा मंजूर करून पीएमआरडीएला फसवल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करून १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजू ठाणगे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याआधारे डॉ.हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला पुण्यातील शिवाजी नगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कोविड जम्बो सेंटरचे कंत्राट देण्यात आले होते. वैद्यकीय सेवेच्या कामकाजासाठी निविदा प्रक्रियेत निवड करण्यासाठी बनावट भागीदारी करारनामा करून ही निविदा मंजूर करून फसवणूक केल्याची तक्रार पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांनी लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस आणि त्याचे सहकारी सुजित पाटकर यांच्या विरोधात पुणे शहर पोलिसांकडे २०२० मध्ये जंबो कोविड सेंटर्सच्या वाटपात फसवणूक आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करत १० एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने दिले आहे आणि आता दुसरी २० कोटींची करत आहे असा दावा सोमय्यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसला आरोग्य सेवा पुरविण्याचा अनुभव नाही, परंतु बनावट कागदपत्रे सादर करून २०२० मध्ये शिवाजीनगरमधील जंबो कोविड सेंटरचे कंत्राट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळवले असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

हे ही वाचा:

राजकीय पक्षांवर लक्ष ठेवा नाही तर देश लुटला जाईल!

पाठीच्या कण्याच्या मदतीने त्याने खेचले तब्बल १,२९४ किलो वजनाचे वाहन

दिल्लीच्या साकेत न्यायालयात थरार, महिलेवर वकिलानेच झाडल्या गोळ्या

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

ईडीने केली होती चौकशी

सुजित पाटकर यांची ईडीने चौकशी मध्यंतरी केली होती. या चौकशीमध्ये सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावे होती. वर्षा राऊत या लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये भागीदारांपैकी एक आहेत. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत असायचा दावा सुजित पाटकर यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा