31 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरक्राईमनामासीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १ लाखांची फसवणूक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १ लाखांची फसवणूक

निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

Google News Follow

Related

मुंबईत एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरी पूर्व परिसरात स्वतःला CBI अधिकारी असल्याचे भासवत भामट्याने निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक केली आहे. आरोपीने अटक करण्याची धमकी देत भीती निर्माण केली आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे तब्बल १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, १ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) मधील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगत तुम्हला अटक होऊ शकते, अशी भीती घालण्यात आली. भीतीपोटी तक्रारदाराने सुरुवातीला Google Pay द्वारे २० हजार रुपये पाठवले. यानंतर ४ मार्च रोजी आरोपीने पुन्हा वारंवार फोन करून आणखी पैसे मागितले. १ मार्च ते ४ मार्च या कालावधीत आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी सहा वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण १ लाख १० हजार रुपये पाठवले.

हे ही वाचा: 

उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

अमेरिका ‘मनोरंजन’ म्हणून खार्ग बेटावर हल्ला करेल!

होर्मुझमधील तणाव आणि इंटरनेटचे अदृश्य जग: भारताचे भविष्य काय?

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

यानंतर आरोपीने आणखी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत तक्रारदारांनी त्यानंतर फोन उचलणे बंद केले. दरम्यान, हा प्रकार त्यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर संपूर्ण घटना सायबर फसवणुकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या धमकीच्या फोन कॉल्सना घाबरून कोणालाही पैसे पाठवू नयेत, तसेच अशा घटना घडल्यास त्वरित पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा