30 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरक्राईमनामादिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

दोन महिलांसह तिघांना अटक

Google News Follow

दिल्लीतील प्रीत विहार परिसरातील एका कॅफेमध्ये पार्टी केल्यानंतर २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली असून अन्य तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कडकडडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलमधील एका कॅफेमध्ये काम करते. आरोपीदेखील तिच्यासोबत काम करणारे सहकारी असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री पीडित तरुणीसह आठ जणांचा एक गट प्रीत विहार येथील कॅफेमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता.

संबंधित कॅफे रात्री ११.३० वाजता बंद झाला होता. मात्र, गटातील एका व्यक्तीकडे कॅफेची चावी असल्याने त्यांनी तो पुन्हा उघडला आणि आत पार्टी सुरू केली. यावेळी सर्वांनी मद्यप्राशन केले. तसेच, रात्री उशिरापर्यंत नाचगाणे केल्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वजण कॅफेबाहेर पडले. यानंतर दोन पुरुषांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच, गटातील इतर सहकाऱ्यांनीही या कृत्यात मदत केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा:

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

अरुणाचल सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये दहा दिवस चर्चा

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

प्रियांश आर्यची टी-२०मध्ये ऐतिहासिक १८१ धावांची खेळी

दरम्यान, पोलिसांनी दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितेचा जबाब नोंदविण्यात येत असून तो दंडाधिकाऱ्यांसमोरही नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा