28.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामापोलिसांना भिडण्याचे आव्हान देणाऱ्या गुंडाचे एन्काऊंटर

पोलिसांना भिडण्याचे आव्हान देणाऱ्या गुंडाचे एन्काऊंटर

पोलिसांना मारण्याचे दिले होते आव्हान

Google News Follow

बिहारच्या मोतिहारी येथील एका कुख्यात गुन्हेगाराने पोलिसांना एन्काऊंटर करण्याचे उघड आव्हान दिले खरे पण, त्यानंतर झालेल्या हिंसक चकमकीत त्याचाच अंत झाला. या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलसह दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये फोन कॉलवरून पोलिसांना धमकी देणारा गँगस्टरही समाविष्ट होता.

मृत गँगस्टर कुंदन ठाकूर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये त्याने पोलिसांना दिलेल्या उघड धमक्या ऐकू येतात. चकमकीच्या दोन दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये ठाकूरने चकिया पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला फोन करून थेट आव्हान दिले. त्याने इशारा दिला की पोलिसांनी ठरवलेल्या कोणत्याही वेळेला आणि ठिकाणी तो हजर असेल आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्नात अनेक पोलिसांचा जीव जाईल.

ऑडिओ क्लिपमध्ये तो म्हणताना ऐकू येतो की, “पुढची मोठी बातमी अशी असेल की एका एन्काउंटरमध्ये १० ते १५ पोलिसांचा मृत्यू झाला आणि गुन्हेगार पळून गेला. गँगस्टर असणे म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवून देईन.”

हे ही वाचा:

एका हंगामात बॅटने वादळ घालणारे टॉप-३ महारथी

बांगलादेश वर्ल्डकप का खेळला नाही; आता होणार चौकशी!

इराणच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख अली लारिजानीसह मुलगा, अंगरक्षक ठार

डेटिंग ॲप ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश

ठाकूरने पोलिसांवर आपल्या कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप केला आणि जर त्याच्या कुटुंबाला त्रास दिला गेला तर पोलिसांच्या कुटुंबांवर सूड उगवण्याची धमकी दिली. त्याने वारंवार सांगितले की तो फरार नाही आणि कोणत्याही चकमकीत तो पोलिसांना समोरासमोर भिडेल. धमकी देत आहात का, असे विचारले असता, ठाकूरने ते धमकी नसून सल्ला असल्याचे सांगितले.

पोलिस सूत्रांनुसार, कुंदन ठाकूरवर बराच काळ नजर ठेवली जात होती. त्याच्या ठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलिस पथकाने रात्री उशिरा नाकाबंदी केली. पथक तेथे पोहोचताच उपस्थित गुन्हेगारांनी कोणतीही चिथावणी नसताना गोळीबार सुरू केला. या अचानक झालेल्या चकमकीत एसटीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले, ज्यामुळे पोलिस दलात शोककळा पसरली.

या नुकसानीनंतरही पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले. गोळीबाराच्या या देवाणघेवाणीत कुंदन ठाकूर आणि इतर दोन गुन्हेगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. कारवाईदरम्यान काही काळ परिसरात गोळीबाराचे आवाज घुमत होते.

पूर्व चंपारणचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी सांगितले की, ठाकूर पोलिसांना सतत धमक्या देत होता आणि त्याला अटक करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. पोलिसांनी त्याचे लपण्याचे ठिकाण घेरल्यानंतर गुन्हेगारांनी हल्ला केला, त्यामुळे बचावात्मक कारवाई करावी लागली.

या कारवाईदरम्यान ज्या घरात गुन्हेगार लपले होते त्या घराचा मालक उज्ज्वल कुमार आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांना कितपत आश्रय दिला गेला होता हे जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा