26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरक्राईमनामागँगस्टर विकास दुबेची मालमत्ता जप्त होणार

गँगस्टर विकास दुबेची मालमत्ता जप्त होणार

नवी दिल्लीच्या निर्णायक प्राधिकाऱ्यांची मोहोर

Google News Follow

Related

कानपूरच्या बिकरू प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याची मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयावर दिल्ली निर्णायक प्राधिकाऱ्यांनी मंजुरीची मोहोर उमटवली. ईडीने नोव्हेंबर, २०२२मध्ये विकास दुबे, पत्नी रिचा दुबे आणि टोळीतील सहकारी जयकांत बाजपेई यांच्या १०.१२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती.

ईडीने तीन महिन्यांपूर्वी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. विकास दुबे आणि जयकांत यांनी खंडणी, हत्या, जमिनीवर अतिक्रमण, रेशनिंगमध्ये गैरव्यवहार आदी गुन्हे करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली होती, असे चौकशीत समोर आले होते.

हे ही वाचा:

दक्षिण दिल्लीत गायीचे शव सापडल्यानंतर धमक्या, द्वेषयुक्त भाषणे

कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!

‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’

यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

दुबे आणि त्याच्या साथीदारांचा भूमाफिया, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठीच्या निधीचा अपहार, खंडणी, हत्या, फसवणूक इत्यादी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. २ जुलै २०२०च्या रात्री रात्री विकास दुबेला अटक करण्यासाठी उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा जात असताना त्यांच्यासह आठ पोलिसांवर बिक्रू गावात हल्ला करण्यात आला. दुबे १० जुलै २०२० रोजी चकमकीत मारला गेला. नुकतेच ईडीने विकास दुबे आणि लखनऊमधील त्याच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विकास दुबे, त्याची पत्नी ऋचा दुबे आणि टोळीतील इतर पाच सदस्यांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) खटला दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा