मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. धमकीचा ईमेल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला नसून यावेळी हा मेल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका ईमेलवर आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल २ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा हा ईमेल होता.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल २ गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट टाळण्यासाठी ४८ तासांच्या आत १ दशलक्ष डॉलर्स बिटकॉईन्स देण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास सुरुवात केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकावणं आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम ३८५, ५०५(१)(ब) अन्वये एफआयआर नोंदवला आहे.
हे ही वाचा:
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता इस्रायली तरुणीचा मृतदेह सापडला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुरुवारी सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (MIAL) फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता. आरोपीनं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, “तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे. असं न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल २ वर ४८ तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, हे टाळण्यासाठी आम्हाला बिटकॉइनमध्ये १ दशलक्ष डॉलर्स पाठवावेत.”







