29 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरक्राईमनामामुख्यमंत्री रेखा गुप्ता प्रकरण: आरोपीला ₹२००० पाठवणाऱ्याला घेतले ताब्यात!

मुख्यमंत्री रेखा गुप्ता प्रकरण: आरोपीला ₹२००० पाठवणाऱ्याला घेतले ताब्यात!

दिल्ली पोलिसांची कारवाई 

Google News Follow

Related

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपीला ₹२००० आर्थिक मदत पाठवणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.  तहसीन सय्यद असे त्या व्यक्तीचे नाव असून तो राजकोट येथील रहिवासी आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना हल्लेखोराच्या खात्यावर आलेली आर्थिक व्यवहाराची माहिती मिळवली. त्यातून उघड झालं की, एका व्यक्तीने ऑनलाइन माध्यमातून आरोपीला ₹२००० पाठवले होते. तपासात या रकमेचा हल्ल्यानंतर आरोपीच्या पळून जाण्यासाठी वापर झाल्याचा संशय आहे.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं, आणि सध्या त्याच्यावर आर्थिक सहाय्य, कट रचणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. तो आरोपीचा मित्र किंवा सहकारी असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, त्या व्यक्तीसह इतर चार जणांना दिल्ली पोलिसांनी राजकोट येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता त्याला अधिक चौकशीसाठी दिल्लीला आणण्यात आले आहे. 

हे ही वाचा : 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमारांनी विधानसभेत गायले आरएसएसचे गीत

“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”

“डी.के. शिवकुमार कर्नाटकाचे मोठे कलाकार, त्यांना गांभीर्याने घेऊ नका”

“छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची अमानुष क्रूरता: तिरंगा फडकवल्याबद्दल तरुणाची हत्या!”

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, “या आर्थिक व्यवहारातून हल्ल्याच्या कटात आणखी कोणकोण सहभागी होते याचा शोध घेण्यास मदत मिळणार आहे. प्रकरणात अजून काही आर्थिक लिंक उघड होण्याची शक्यता आहे.” दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश भाई खिमजी भाई सकारिया हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. पोलिसांकडून अधिक चौकशी आणि पुढील तपास सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा