29 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरक्राईमनामा५० फुटावरून झुला खाली आदळला आणि

५० फुटावरून झुला खाली आदळला आणि

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.

Related

पंजाबमधील मोहालीमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. मोहालीच्या दसरा मैदानावर सुरू असलेल्या जत्रेत काही सेकंदात झुला तुटून दाणकन जमिनीवर आदळला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल आणि फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पंजाबमधील मोहालीच्या सेक्टर ६५ मध्ये जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने येथे मोठी गर्दी होती. जत्रेत लावलेल्या झुल्यावर महिला आणि मुले बसली होती. हा झुला जमिनीपासून सुमारे ५० फूट उंच होता. झुला फिरत असताना काही कळायच्या आत काही सेकंदात अचानक तो तुटून खाली पडला. या अपघातात झुल्यावर बसलेल्या महिला व लहान मुले जखमी झाली.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातातील जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे १८ ते २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जखमींचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. हा मोठा निष्काळजीपणा असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. लोकांकडे दुर्लक्ष झाले आहे. झूला सुरू करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली असती तर मोठी दुर्घटना टाळता आली असती, असे नागरिकांनी मतं व्यक्त केले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये

हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…

या दुर्घटनेत सुमारे दहा जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा