31 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरक्राईमनामाआयुष्मान खुरानाला धमकी देणारा ‘आयआयटीयन’ बंगळुरूतून गजाआड

आयुष्मान खुरानाला धमकी देणारा ‘आयआयटीयन’ बंगळुरूतून गजाआड

खंडणीचा प्रयत्न की खोडसाळपणा? मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी

Google News Follow

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर धमकीचे संदेश पाठवून पैशांची मागणी करणाऱ्या एका ३० वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने बंगळुरूमधून बेड्या ठोकल्या आहेत. वैभव मिश्रा असे या आरोपीचे नाव असून तो ‘आयआयटी’चा (IIT) पदवीधर असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी वैभव मिश्रा याने आयुष्मान खुरानाला इन्स्टाग्रामवर धमकीवजा संदेश पाठवून पैशांची मागणी केली होती. ही केवळ खोड (प्रँक) असावी असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे; मात्र यामागचा खरा हेतू शोधण्यासाठी तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.

आरोपीने हे मेसेज नेमके का पाठवले आणि पैशांची मागणी हा खंडणी उकळण्याचा सुनियोजित कट होता की निव्वळ खोडसाळपणा, हे स्पष्ट करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी त्याचा जबाब नोंदवत आहेत.

हे ही वाचा:

विराटच्या १३ टॅटूंमागे दडलंय तरी काय?

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

राजस्थानात रेल्वे रुळावर भीषण स्फोट!

विनय आपटे स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

तुषार कपूर प्रकरणानंतर कारवाई

अभिनेता तुषार कपूरला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धमकी मिळाल्यानंतर काही दिवसांतच ही दुसरी मोठी कारवाई झाली आहे. तुषार कपूरला आलेल्या संदेशात संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित हस्तक ‘हॅरी बॉक्सर’ अशी दिली होती. मात्र, गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि व्हॉईस ॲनालिसिस केले असता, त्या संदेशातील आवाज आणि बॉक्सरच्या उपलब्ध ऑडिओ नमुन्यांमध्ये कोणतीही साम्यता आढळली नाही.

कोणीतरी बनावट ओळखीचा गैरवापर करून भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आल्याने, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे (AEC) सोपवला आहे. दरम्यान, तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना या दोन्ही प्रकरणांमध्ये एकमेकांशी काही थेट संबंध आहे का, याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा