28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामादहिसरमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडची बेकायदा वाहतूक उघड

दहिसरमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडची बेकायदा वाहतूक उघड

लक्झरी कारसह ५२.५ लिटर अॅसिड जप्त

Google News Follow

कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसताना धोकादायक रासायनिक पदार्थ असलेल्या हायड्रोक्लोरिक अॅसिडची लक्झरी कारमधून बेकायदा वाहतूक केल्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे. दहिसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५२.५ लिटर हायड्रोक्लोरिक अॅसिडसह ते वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली ‘फोर्ड एंडेव्हर’ कार जप्त केली आहे. या प्रकरणी अजय जितनारायण सिंग (४९, रा. अंबावाडी, दहिसर पूर्व) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिसर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहिसर पूर्वेकडील रत्ननगर परिसरातील घनश्याम दुबे पार्किंगजवळ, सेंट झेवियर्स शाळेच्या परिसरात एका संशयित फोर्ड एंडेव्हर कारची तपासणी करण्यात आली. या कारची झडती घेतली असता विविध क्षमतेच्या १० प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून ठेवलेले एकूण ५२.५ लिटर हायड्रोक्लोरिक अॅसिड पोलिसांना आढळून आले.
हे ही वाचा:
रायगडमध्ये पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

हेन्री कगन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल

घ्या, काँग्रेसला बॅलेटनेही बुडवले…

भारत, इस्रायलसमोर इस्लामी दहशतवादी हल्ल्यांच्या लाटेची भीती
या रासायनिक पदार्थाची वाहतूक किंवा विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत कागदपत्रे अजय सिंग याच्याकडे नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अॅसिडचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन न करता अशा धोकादायक रासायनिक पदार्थाची वाहतूक केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजय सिंग याला नियमानुसार नोटीस बजावली असून, जप्त करण्यात आलेला रासायनिक साठा पुढील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कावळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा