29 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरक्राईमनामासंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश

एकाला अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

Google News Follow

बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) पर्यटकांना विहित दरापेक्षा जास्त दराने बनावट तिकिटांची विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आकाश रवींद्र सरदार (३१) याला अटक करण्यात आली असून, बनावट तिकिटे तयार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय उद्यानाचे वनपाल शिवराज बालाजी उगले (३१) हे कर्तव्यावर असताना एका पर्यटकाने त्यांच्याकडे तक्रार केली. एका व्यक्तीने प्रवेशासाठी आपल्याला फाटलेले तिकीट विकल्याचे पर्यटकाने सांगितले. तिकिटाबाबत संशय आल्याने वनपाल उगले यांनी अधिकृत तिकीट खिडकीवर जाऊन त्याची पडताळणी केली. त्यावेळी संबंधित तिकीट अधिकृत तिकीट काउंटरवरून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर तिकीट विकणाऱ्या आकाश सरदार याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे एकूण नऊ तिकिटे आढळून आली. या तिकिटांचा कागद, छपाई आणि वापरण्यात आलेला फॉन्ट अधिकृत तिकिटांपेक्षा वेगळा असल्याचे तपासात आढळले. त्यानंतर वनपाल उगले यांनी आकाश सरदार याला कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हे ही वाचा:
दहिसरमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडची बेकायदा वाहतूक उघड

रायगडमध्ये पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

हेन्री कगन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल

दिल्लीच्या सीमापुरीत चार मजली इमारत कोसळली

पोलिसांच्या चौकशीत आकाश सरदार याने ही बनावट तिकिटे गणेश ईश्वर ठाकूर याने तयार करून विक्रीसाठी दिल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गणेश ठाकूर याच्याकडे बनावट तिकिटांची छपाई करण्यासाठी आवश्यक मशीन आणि विशेष सॉफ्टवेअर असल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. या रॅकेटमार्फत आतापर्यंत किती बनावट तिकिटांची विक्री करण्यात आली, त्यातून शासनाची नेमकी किती रुपयांची फसवणूक झाली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कस्तुरबा मार्ग पोलीस करत आहेत. तसेच बनावट तिकिटांची निर्मिती आणि विक्रीचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा