29 C
Mumbai
Sunday, May 21, 2023
घरक्राईमनामालालबागच्या गणेश गल्लीत खळबळ; मुलीच्या हत्या करून पित्याचीही आत्महत्या

लालबागच्या गणेश गल्लीत खळबळ; मुलीच्या हत्या करून पित्याचीही आत्महत्या

पोलिसांना सापडली सुसाईड नोट, तपास सुरू

Google News Follow

Related

४२ वर्षीय पित्याने ११ वर्षीय मुलीची गळफास देऊन हत्या केली, त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लालबागच्या गणेश गल्ली येथे घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने पत्नीला दोषी ठरवले आहे.या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपमृत्युची नोंद करून मृत पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूपेश पवार (४२) आणि आर्या (११) असे पित्याचे आणि मुलीचे नाव आहे. भुपेश पवार हे शेअर ब्रोकर असून ते पत्नी भाग्यश्री (३८) सह लालबाग गणेश गल्ली येथील विमावाला महल या इमारतीत राहण्यास होते.आर्या ही शालेय शिक्षण घेत होती, तर पत्नी एका खाजगी कंपनीत डेटा एन्ट्रीची नोकरीला आहे.

मंगळवारी दुपारी पत्नी भाग्यश्री ही पतीच्या मोबाईलवर सतत फोन करून देखील फोन घेत नसल्यामुळे तिला संशय आला व ती थेट कामावरून ४ वाजता घरी निघून आली. घराचे दार आतून बंद असल्यामुळे तिने दार ठोठावून आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे तिने पोलिसांना कळवले.

हे ही वाचा:

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

रथ जगन्नाथ मंदिराचा! लंडनमध्ये उभारलं जातंय पहिलं मंदिर

गौतमीचा हल्लागुल्ला अजितदादांचा सल्ला

अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये

 

काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता भूपेश पवार आणि मुलगी आर्या दोघे एकाच दोरीला गळफास अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दोघांना खाली उतरवून तात्काळ केईएम रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी भूपेश याने लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माझ्यानंतर मुलीचे काय होणार म्हणून हे पाऊल उचलत असून या घटनेला पत्नीला दोषी ठरवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेऊन मृत भुपेश पवार यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,853चाहतेआवड दर्शवा
2,026अनुयायीअनुकरण करा
73,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा