32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषरथ जगन्नाथ मंदिराचा! लंडनमध्ये उभारलं जातंय पहिलं मंदिर

रथ जगन्नाथ मंदिराचा! लंडनमध्ये उभारलं जातंय पहिलं मंदिर

ओडिशाच्या व्यावसायिकाकडून २५० कोटी रुपयांची देणगी

Google News Follow

Related

लंडनमध्ये एक ब्रिटीश धर्मादाय संस्था भगवान जगन्नाथ मंदिर बांधण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. हा नियोजित प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी ओडिशाच्या मूळ निवासी असलेल्या एका उद्योजकाने घेतलेल्या पुढाकाराची मोठी मदत होणार आहे. या मंदिरासाठी उद्योजकाने निधी देण्याची तयारी दर्शवली आहे.

ओडिशाचे मूळ व्यावसायिक विश्वनाथ पटनायक यांनी २५४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे मंदिर उभारणीचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. हे लंडनमधील पहिले मंदिर ठरणार आहे. इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या श्री जगन्नाथ सोसायटीच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात येत आहे.

जागतिक पातळीवरील भारतीय गुंतवणूकदार विश्वनाथ पटनायक यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लंडनमध्ये पहिल्या श्री जगन्नाथ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पटनायक यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर भक्तांना लवकरात लवकर भगवान जगन्नाथाच्या मंदिराचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. या संमेलनात भारताचे उपउच्चायुक्त सुजित घोष आणि भारताचे सांस्कृतिक मंत्री अमिश त्रिपाठी, महाराणी लीलावती पट्टमहादेई, पुरीचे महाराजा गजपती महाराजा दिब्यसिंग देब उपस्थित होते.

विश्वनाथ पटनायक हे फायनेस्ट ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि प्रकल्पाचे प्रमुख देणगीदार आहेत. विश्वनाथ पटनायक यांनी लंडनमध्ये भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी २५४ कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले असल्याचे या धर्मादाय संस्थेने म्हटले आहे. फायनेस्ट ग्रुपही एक खाजगी इक्विटी गुंतवणूक कंपनी आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर अक्षय, इलेक्ट्रिक वाहने , हायड्रोजन लोकोमोटिव्ह, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि फिनटेकमध्ये गुंतवणूक करते. समूहाने नवीन मंदिरासाठी अंदाजे १५ एकर जमीन खरेदी करण्यासाठी ७१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मंदिर बांधण्यासाठी योग्य जमिनीची निवड करण्यात आली असून ती सध्या खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या बांधकामासाठी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज स्थानिक सरकारी कौन्सिलकडे सादर करण्यात असल्याचे श्री जगन्नाथ सोसायटीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयईएस, बांद्रा ज्युनियर महाविद्यालयाला विजेतेपद

अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

युरोपातील पहिले जगन्नाथ मंदिर

लंडनमधील श्री जगन्नाथ मंदिराच्या विधीनुसार याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या अवतारांना पहिल्यांदाच भगवान विष्णूचे दिव्य शस्त्र, सुदर्शन चक्राने अभिषेक करण्यात आला. या तिन्ही मूर्ती सध्या ब्रिटनमधील सर्वात जुन्या साऊथ हॉलच्या श्री राम मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. लंडनमध्ये बांधण्यात येणारे मंदिर हे युरोपातील पहिले जगन्नाथ मंदिर असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा