38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामाएमपीएससी पेपरफुटीचे प्रकरणी सांगली, बुलढाणा, नवी मुंबईतून चौघे गजाआड

एमपीएससी पेपरफुटीचे प्रकरणी सांगली, बुलढाणा, नवी मुंबईतून चौघे गजाआड

अटकेची संख्या ११ वर

Google News Follow

Related

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरव्यवहारांचे जाळे आणखी विस्तारल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ पदभरतीच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत सांगली, बुलढाणा आणि नवी मुंबईतून आणखी चौघांना बेड्या ठोकल्या. यामध्ये गैरमार्गाने पेपर मिळवणाऱ्या दोन उमेदवारांसह दोन मध्यस्थांचा समावेश आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणातील एकूण अटकेची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक संवर्गातील १५४ जागांसाठी २२ मार्च रोजी राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा पार पडली होती. मात्र, परीक्षेची संपूर्ण गोपनीयता धुडकावून आर्थिक गैरव्यवहारातून प्रश्नपत्रिकांची खरेदी-विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ज्ञानेशकुमार, २४ तासात राजीनामा द्या, नाहीतर २ ऑक्टोबरपासून आंदोलन

राहुल गांधींना आरसा दाखवणारा चेन्निथलांचा जुना व्हीडिओ व्हायरल

बिहारच्या मंदार हिलवर महिलेला विनयभंगानंतर मारहाण

साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा

तांत्रिक विश्लेषणातून पर्दाफाश
गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २४ सप्टेंबर रोजी छापेमारी करत चौघांना ताब्यात घेतले:
* साजिद संदे (उमेदवार – सांगली)
* विजय किंगर (उमेदवार – बुलढाणा)
* संदिप खलाटे (मध्यस्थ – नवी मुंबई)
* भैरवनाथ कदम (मध्यस्थ – नवी मुंबई)

गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर

यापूर्वी गुन्हे शाखेने केलेल्या तपासात थेट आयोगाच्या गोपनीय कक्षातूनच प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी आयोगाचे अवर सचिव अभिजित लेंडवे, गोपनीय कक्षातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे यांच्यासह ‘कौटिल्य ॲकॅडमी’चा संचालक प्रवीण पाटील, दलाल अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना याआधीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता अटक करण्यात आलेल्या नव्या संशयितांमुळे हे रॅकेट आणखी कुठे पसरले आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा