27.1 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरक्राईमनामासचिन वाझे प्रकरणातील मर्सिडीज ताब्यात

सचिन वाझे प्रकरणातील मर्सिडीज ताब्यात

Google News Follow

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या खटल्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या प्रकरणात एनआयएने एक मर्सिडीज गाडी देखील ताब्यात घेतली आहे.

मनसुख हिरेन यांची गाडी बिघडल्यानंतर तो एका कॅबमधून क्रॉफर्ड मार्केट येथे गेला. तिथे मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची याच काळ्या मर्सिडीजमध्ये भेट झाली होती. ही गाडी सचिन वाझेच वापरत होता. परंतु जेव्हा एनआयएच्या टीमला ही गाडी जेव्हा पोलिस मुख्यालयात मिळाली तेव्हा या गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. यापुर्वी देखीव वाझे याने गाड्यांची नंबर प्लेट बदलली आहे. त्यामुळे या प्रकरणात सापडलेली ही तिसरी संशयास्पद गाडी आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली एक स्कॉर्पिओ गाडी उभी होती. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली. त्यावेळी या गाडीच्या प्रकरणाचे धागेदोरे खुद्द मुंबईतील क्राईम ब्रांचची शाखा असलेल्या सीआययुचे प्रमुख अधिकारी सचिन वाझे यांच्याशी जुळलेले आढळले. त्यामुळे सचिन वाझे यांना देखील अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार

सत्तेसाठी आणखीन किती लोकांना वाचवणार उद्धवजी? फडणवीस यांचा सवाल

जयंत पाटील म्हणतात, वाझे प्रकरणावर चर्चाच नाही

या प्रकरणाची आणखी चौकशी करताना, स्कॉर्पिओसोबतच एक पांढरी इनोव्हा आणि मर्सिडिज देखील आढळली होती. एनआयएने ही इनोव्हा ताब्यात घेतली होती. परंतु मर्सिडीजचा शोध मात्र चालू होता. नुकतीच ही मर्सिडिज देखील एनआयएने ताब्यात घेतली आहे. ही गाडी या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानली जात आहे.

यासोबतच एकूण ७ पोलिसांना देखील या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन वाझे याच्या सहकाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे.

या प्रकरणात विरोध पक्षनेत्यांनी ठाकरे सरकारला सातत्याने धारेवर धरले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा