28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामान्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले

न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले

Google News Follow

Related

अँटिलिया स्फोटकप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला माजी पोलिस सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह भेटीच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाल्यानंतर आता चांदीवाल आयोगाने या प्रकरणाची दखल घेत वाझेवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय, पोलिसांनाही समज दिली आहे.

आयोगाच्या कोर्टाबाहेर आरोपीबाबत जे काही घडेल त्याची जबाबदारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची असेल, अशा इशारा  न्या. चांदीवाल यांनी दिला आहे. या प्रकरणानंतर चांदीवाल यांनी पोलिसांनाही खडसावले आहे. सचिन वाझेला आयोगासमोर घेऊन येताना वाझे आणि परमबीर यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावरून आयोगाने ही तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, परमबीरसिंह आणि सचिन वाझे यांच्यात चांदीवाल आयोगाच्या बाहेर झालेल्या भेटीसंदर्भात मुुंबई पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आदेश दिले असून त्यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंह यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारलेला नाही. चौकशीला जाताना शासकीय गाड्यांचा परमबीर सिंह यांनी वापर करणे चुकीचे आहे. परमबीर यांच्या निलंबनाबाबत चौकशी सुरू आहे.

चांदीवाल आयोगाने १३ डिसेंबरला वाझेला पुन्हा आयोगापुढे हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, वाझे-परमबीर भेटीनंतर वाझे-देशमुख यांच्यातही भेट झाल्याचे बोलले जात आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे आयोगाबाहेर एकाच खोलीत जवळपास १० मिनिटे होते. मंगळवारी चांदीवाल आयोगाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब झाले. अनिल देशमुखांच्या वतीने ज्येष्ठ वकील उपस्थित राहणार असल्याने आयोगाकडे विनंती करण्यात आली होती.

हे ही वाचा:

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

चारपैकी मुख्यमंत्री परिवारातील दोन नेते घोटाळेबाजांमध्ये

मेस्सीचा सातवा हा प्रताप! बॅलन डी ओर पुरस्काराने पुन्हा सन्मान

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

 

गृहमंत्री यांनी परमबीर यांना सरकारी गाडी वापरता येणार नाही, असे म्हटल्यानंतर परमबीर सिंग आणि त्यांच्या वकिलांनी गाडी बदलली. परमबीर सिंग हे आपल्या अधिकृत गाडीत न बसता एक इनोव्हा गाडीत बसले. त्यानंतर सिंग यांची गाडी पी डीमेलो रोडने निघाली. सिंग यांना आज कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीने समन्स देऊन आज चौकशीला बोलावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा