27.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरक्राईमनामाप्रखर धर्माभिमानी काजल हिंदुस्थानी यांना अखेर जामीन मंजूर

प्रखर धर्माभिमानी काजल हिंदुस्थानी यांना अखेर जामीन मंजूर

भडकावू भाषण केल्याचा आरोपावरून झाली होती अटक

Google News Follow

Related

अत्यंत परखड, स्पष्टवक्ता म्हणून आज देशभरात स्वतःची ओळख निर्माण केलेली हिंदू कार्यकर्ती, उजव्या विचारसरणीच्या महिला काजल हिंदुस्थानी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राम नवमीला केलेल्या भाषणाच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली होती. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल पाच दिवसांनी त्यांची जुनागढ येथील तुरुंगातून सुटका झाली आहे.

रविवारी ९ एप्रिल रोजी गुजरातच्या उना पोलिसांनी काजल हिंदुस्थानी यांना पोलिसांनी अटक केली होती. द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांना ही अटक केली गेली.

३० मार्च रोजी रामनवमीची मिरवणूक उना या गिर सोमनाथमधील गावात काढण्यात आली होती. त्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील वक्त्यांमध्ये काजल हिंदुस्थानी यांचाही समावेश होता. त्रिकोण बाग येथील रावणवाडी येथे ही धर्मसभा भरली होती. या भाषणादरम्यान काजल हिंदुस्थानी यांनी अनेक विषयांना हात घातला. त्यात लव्ह जिहाद, जमीन जिहाद हे ज्वलंत मुद्देही होते. स्थानिक मुस्लिमांनी हे मुद्दे द्वेष पसरविणारे आहेत असा आक्षेप घेतला आणि त्यानंतर संपूर्ण शहर पेटले.

नेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. जवळपास दोन दिवस हे शहर धगधगत होते. शिवाय, काजल हिंदुस्थानी यांच्याविरोधात सर तन से जुदा यासारख्या दहशत निर्माण करणाऱ्या घोषणाही करण्यात आल्या. या भाषणात त्या म्हणाल्या होत्या की, मुस्लिम महिलांनी जर हिंदू व्यक्तीशी विवाह केला तर त्या महिलेला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तसेच त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली. २९५ ए, १५३ ए, ५०५ या कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

चिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. विक्रीत दणदणीत वाढ

गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई

कोण आहेत काजल हिंदुस्थानी?

काजल हिंदुस्थानी या प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ट्विटरवरील प्रोफाइलमध्ये त्या प्रखर देशभक्त असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. त्यांचे जवळपास ९५ हजार फॉलोअर्स आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. त्यांचे मूळ नाव काजल सिंगाला असे आहे. गुजरातची सिंहीण म्हणून त्या स्वतःची ओळख करून देतात. काजलसिंगाला डॉट कॉम या नावाने त्यांची वेबसाईटही आहे. सातत्याने राष्ट्रवादी भूमिका मांडत असल्यामुळे त्यांनी स्वतःचे नाव काजल हिंदुस्थानी असे ठेवले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा याचा प्रसार प्रचार करणे हे आपले काम असल्याचे त्यांच्या वेबसाईटमधून स्पष्ट होते. हिंदूंच्या मानवी हक्कांसाठी आपण लढत असल्याचा दावाही त्या करतात.

उजव्या विचारसरणीच्या विचारमंचांवर त्या नेहमीच आपले प्रखर विचार मांडत असतात. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या मंचांवर त्यांची भाषणे होत असतात. गुजरातमधील जामनगर येथील त्या रहिवासी असून २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचा प्रचारही केला होता. राजस्थानात ओम बिडला यांच्या प्रचारासाठीही त्या २०१९मध्ये उतरल्या होत्या. त्या निवडणुकीत बिडला हे विजयी झाले होते. त्यानंतर ते आता लोकसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आपण हिंदु धर्माभिमानी असल्याचे त्या सांगतात आणि विविध टीव्ही चॅनेलवर चर्चांमध्ये परखडपणे आपली भूमिका मांडताना दिसतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा